Home विदर्भ भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा महामंत्री पदावर रामचंद्र ढोंगे यांची नियुक्ती

भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा महामंत्री पदावर रामचंद्र ढोंगे यांची नियुक्ती

123
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा महामंत्री पदावर रामचंद्र ढोंगे यांची नियुक्ती

गडचिरोली:- (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
माडेतुकुम, गडचिरोली येथील रहिवासी श्री रामचंद्र ढोंगे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या जिल्हा महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष तथा जिप चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे यांनी केली आहे.
खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात रामचंद्र ढोंगे यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जीपचे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी शहर अध्यक्ष सुधाकरराव यनगंधलवार, भाजपचे अनिलजी करपे, पत्रकार नरेंद्र माहेश्वरी उपस्थित होते.
रामचंद्र ढोंगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व त्यांचा अनुभव पाहता त्यांची भारतीय जनता पार्टीच्या संघटन वाढीसाठी मदत होईल या हेतूने त्यांची निवड किसान आघाडी च्या जिल्हा महामंत्री पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. किसान मोर्चा च्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन भाजपचे कार्य व केंद्राच्या योजनांचा प्रसार करून पक्षाचे संघटन वाढविणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.

Previous articleगडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मान The गडविश्व
Next articleदवाखान्यात जाते सांगून घरातून महिला बेपता सटाणा तालुक्यातील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here