Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या...

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न..

130
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आज दिनांक 12 एप्रिल रोजी प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “गरजूंसाठी मदतीचा हात” या उपक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने आज सकाळी ठीक दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय जाहूर येथे भव्य रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले. दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत असून गाव तिथे कोरोनाचे असंख्य रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासह सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने त्याचा मोठा फटका रक्तसंकलनावर वर पडला आहे. कोरोनाच्या भितीमुळे रक्तदान शिबिर होत नसल्याने रुग्णांना रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. रक्ताच्या एका पिशवी साठी नातेवाईकांना रक्तपेढीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. तरीही रक्त मिळत नसल्याने मृत्यूस सामोरे जावे लागत असल्याने अशा कठीण काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने रामदास पाटील सुमठाण कर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा न करता सामाजिक बांधिलकी जोपासत जाहूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात 18 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

Previous articleमुखेड तालुक्यातील तांदळी येथे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..
Next articleदुःखद निधन  भावपूर्ण श्रद्धांजली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here