Home नांदेड मुखेड तालुक्यातील तांदळी येथे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..

मुखेड तालुक्यातील तांदळी येथे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..

101
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील तांदळी येथे घरास आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील सटवाजी विठ्ठल वाघमारे रा. तांदळी यांच्या घरास दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू ज्वारी गहू डाळ कपडे व रोख रक्कम दहा हजार रुपये आगीत जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.होकर्णा सज्जाचे तलाठी श्री ए. एन. करटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. मात्र साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घरास अचानक आग लागली. ही घटना शेजाऱ्यांना व गावकऱ्यांना समजताच त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण घरच पेटल्याने आग विझविण्यासाठी एक तासाचा अवधी लागला. त्यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने निवारा गेला. रोज मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असत त्यामुळे राहण्याचा व खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतमजूरास प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here