Home अमरावती अमरावती एसटी बस स्थानकाची इमारत झाली चार्जर, २५ पोटातून होणार नव्हे बस...

अमरावती एसटी बस स्थानकाची इमारत झाली चार्जर, २५ पोटातून होणार नव्हे बस स्थानक प्रस्ताव सादर.

74
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230920-202004_WhatsApp.jpg

अमरावती एसटी बस स्थानकाची इमारत झाली चार्जर, २५ पोटातून होणार नव्हे बस स्थानक प्रस्ताव सादर.
—————————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख  याजकडुन
अमरावती.
अमरावती येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या सध्या अस्तित्व असलेल्या इमारतीला पन्नास वर्षे झाली असून इमारतीचे आयुर्मान संपले आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या बघून व अन्य अडचणी लक्षात घेता, अमरावती विभाग नियंत्रण कार्यालयाने या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे १५ कोटी 29 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र बस या निधीत बस स्थानकाचे नव्याने बांधकाम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे विभाग नियंत्रण कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर २५ कोटी रुपयाचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. सध्या एक हेक्टर जागेवर बस स्थानकाच्या कारभार सुरू आहे. यामध्ये बस स्थानकात किरकोळ कामासाठी कार्यशाळा तसेच आगर व्यवस्थापकाचे कार्यालय डिझेल पंप साठी विश्रामगृह आदींचा समावेश आहे. त्यामध्ये केवळ दहा फालटा आहेत. बस स्थानकासाठी६० हजार स्केअर फुट जागा असून तेही अपुरे पडत आहे. परिणामी प्रवाशांना गर्दीच्या वेळी गैरसोयीची सामना करावा लागतो. याशिवाय बस स्थानकाच्या छतालाही वारंवार डाग डुगी करावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सण २०२३-२०२४ मध्य राज्यातील बस स्थानकाच्या सोबत अमरावती बस स्थानकाच्या बांधकामासाठी १५.२१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र सध्या आहेत तेवढ्यात जागेत नवीन बस स्थानक तयार करून विशेष फायदा होणार नाही त्यामुळे १५.२१ कोटी येऊ जी२५ कोटी रुपये निधी मिळाल्यास त्या ठिकाणी संपूर्ण जागा बसवण्यासाठी वापरता घेऊन विस्तार न बस स्थानक साकारले जाऊ शकते या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तानुसार बस स्थानकाच्या समोर बाजूने दहा व मागील बाजूने तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बससाठी स्वातंत्र्यपात असे एकूण २५ फलटा प्रस्तावित केले आहे हा प्रस्ताव पाठविला असेल त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मध्यवर्ती बस स्थानक एक लाख स्क्वेअर फुट जागेत साकारले जाणार आहे. त्यामुळे सध्या येथे असलेले आगार व्यवस्थापक कार्यालय तसेच तात्पुरते काय कार्यशाळा मध्यवर्ती कार्यशाळा परिसरात स्थलांतरित करावी लागेल या संपूर्ण बांधकामाचा खर्च तसेच बांधकाम काळात तात्पुरते बस स्थानक या ठिकाणी राहणार तेथील कामासाठी लागणारा खर्च लक्षात घेता २५ कोटी रुपयाचा सुधारित प्रश्न पाठवण्याची माहिती अमरावती विभागीय नियंत्रण निलेश बेलसरे यांनी दिली आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. वंदना खांडेभराड
Next articleफेसबुकवर बिझनेस करणा-यांनो सावधान   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here