• Home
  • कोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 🛑

कोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210204-WA0004.jpg

🛑 कोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 🛑
✍️ पिंपरी-चिंचवड ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

पुणे:- ⭕कोकण खेड युवाशक्ती पिंपरीचिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव समारंभ व हळदी कुंकू समारंभ आनंदात पार पडला.

कार्यक्रमात आरोग्य,पोलिस,शासकीय व इतर विभागातील ज्यांनी कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावुन सेवा केली त्यांना *”कोरोना योद्धा “* म्हणुन ट्रॉफी,सन्मानपञ,नारळ,शॉल देवुन गौरवण्यांत आले.तसेच महिलांनी एकञ येवुन त्यांना व्यासपिठ मिळावे व महिलांना प्रोत्साहन देण्यांसाठी हळदी कुंकंवाचे आयोजन करण्यांत आले होते.या वेळी प्रमुख उपस्थिती मा.सौ.विजयाताई सुतार(मा.नगरसेविका),मा.सौ.अश्विनीताई जाधव(मा.नगरसेविका ),मा श्री.परेश मोरे सर (कामगार नेते),मा.श्री.अशोक कदम ,मा श्री राम सकपाळ ,मा श्री राम उत्तेकर ,श्री.रूपेश कदम , श्री गजानन मोरे , उद्योजक श्री.मनोहर यादव , श्री संदिप साळुंखे,श्री अभिजीत कदम व इतर मान्यवर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवर,उपस्थितीत बांधवांनी कोकण खेड युवाशक्तीच्या आतापर्यंत केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करून खुप खुप शुभेच्छा दिल्या.तसेच युवाशक्तीच्यावतीने भविष्यांत देखील सामाजिक, शैक्षणिक,कला क्रिडा व इतर समस्यां सोडवण्यासाठी अग्रगण्य राहिल अशी युवाशक्तीचे अध्यक्ष श्री.संजय मोरे यांनी ग्वाही दिली.

त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण खेड युवाशक्तीचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक श्री.अक्षय मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.संदिप कदम सर यांनी केले. ⭕

anews Banner

Leave A Comment