Home नाशिक फेसबुकवर बिझनेस करणा-यांनो सावधान   

फेसबुकवर बिझनेस करणा-यांनो सावधान   

181
0

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0050.jpg

फेसबुकवर बिझनेस करणा-यांनो सावधान     (इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी) फेसबुक (Facebook) हे आता केवळ सोशल मीडिया अॅप्लिकेशन (Social Media Application) नाही. अनेक जण तिथे आपल्या कामाची प्रसिद्धी करतात. फेसबुकवर आपली प्रॉडक्ट्स विकता येतात आणि ग्राहक थेट संपर्क साधून ती खरेदी करू शकतात. फेसबुकच्या या सुविधा सर्वसामान्य युझर्ससाठी खूप उपयुक्त आहेत; मात्र या सुविधांचा गैरवापर करून मोठ्या पातळीवर सायबर घोटाळे केले जात आहेत. हे घोटाळे नेमके कसे असतात, हे जाणून घ्या शाहरुख नावाच्या व्यक्तीचं वॉटर प्युरिफायर सर्विस व विक्रीचं दुकान आहे. आपल्या उद्योगाची व्याप्ती वाढवण्यासाठी शाहरुख यांनी फेसबुक मार्केटप्लेसवरही (Facebook Marketplace) आपल्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध केली आहे. फेसबुकवरून माहिती घेऊन अनेक जण त्यांच्याशी संपर्क साधतात आणि प्रत्यक्ष येऊन सामानाची खरेदी करतात. लोकांच्या मागणीनुसार सामानाची होम डिलिव्हरीही करतात.
एके दिवशी शाहरुख यांना एक व्हाट्सअप मेसेज आला. व्हाट्सअप करणाऱ्या व्यक्तीने व्हाट्सअप कॉल करून मंजीत सिंग असं आपलं नाव असल्याचं सांगितलं आणि नासिक देवळाली कॅम्प आर्मी कँटमधून (Army Cantt) बोलत असल्याचं सांगितलं. तसेच फेसबुकवर दिसत असलेल्या वॉटर प्युरिफायर सध्या दुकानात उपलब्ध आहेत का किंमत अशी विचारणा मंजीत सिंगनी केली. त्यावर शहारुख यांनी सांगितलं, की वॉटर प्युरिफायर उपलब्ध आहेत. मंजीत सिंग याने मी आर्मी मध्ये आहे मला काही डिस्काउंट मिळेल का त्यावर शाहरुख बोलले की करून देऊ त्यानंतर मंजीत सिंगने व्हाट्सअप वर शाहरुख यांची ड्रायव्हिंग लायसन , पॅन कार्ड ,आधार कार्ड गुगल पे किंवा फोन ,पे पेटीएम नंबर पाठवा असे सांगितले. शाहरुख यांना शंका येऊ नये यासाठी मंजीत सिंगने म्हणून त्याने व्हॉट्सअॅपवर अनेक फोटोज पाठवले. ते देवळाली कॅम्प आर्मी कँटचे होते. (कदाचित त्याने ते फोटो इंटरनेटवरून डाउनलोड करून पाठवले असावेत.) शाहरुख यांच्या लक्षात आलं होतं, की आपली फसवणूक (Cyber Fraud) होत आहे. एक जागरूक नागरिक प्रमाणे शाहरुख यांनी व्हाट्सअप वर त्यांना ब्लॉक केले तसेच कोणालाही असे मेसेज आल्यास कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नये सरळ त्यांना ब्लॉक करण्यात यावा असे सांगितले.पण अशा वेळी प्रत्येकाने सावध होऊन कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण देशातील सैनिकांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

Previous articleअमरावती एसटी बस स्थानकाची इमारत झाली चार्जर, २५ पोटातून होणार नव्हे बस स्थानक प्रस्ताव सादर.
Next articleमाढा महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसाठी ५ कोटीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here