Home माझं गाव माझं गा-हाणं युवा मराठा न्युजचे संपादक राजेंद्र पवार यांची नाशिक जिल्हा ग्रंथालय सेलच्या मालेगाव...

युवा मराठा न्युजचे संपादक राजेंद्र पवार यांची नाशिक जिल्हा ग्रंथालय सेलच्या मालेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

328
0

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्युजचे संपादक राजेंद्र पवार यांची नाशिक जिल्हा ग्रंथालय सेलच्या मालेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
सटाणा,-जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या मालेगांव तालुका अध्यक्षपदी युवा मराठा न्युजचे संपादक व व-हाणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र तुकाराम पवार यांची निवड करण्यात आली.राजेंद्र पवार हे व-हाणे येथील रहिवाशी असून,त्यांचा विविध सामाजिक चळवळीत विशेष सक्रीय सहभाग असतो. आज सटाणा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार व ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते राजेंद्र पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.त्याप्रंसगी मा. आ. श्री संजय नाना चव्हाण,माजी आमदार सौ.दिपिका चव्हाण, ओ.बी सी सेल जिल्हा अध्यक्ष श्री समाधान जेजुरकर राष्ट्रवादी सटाणा तालुका अध्यक्ष श्री शैलेश सुर्यवंशी मा.जि. प.सदस्य श्री यशवंत शिरसाठ शहर अध्यक्ष श्री राजेन्द्र सोनवणे.व कार्यकर्त उपस्थित होते .राजेंद्र पवार यांच्या या निवडीचे युवा मराठा महाराष्ट्राच्या वतीने मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,कार्यकारी संपादक संजय महाले आदीनी व युवा मराठाच्या सगळ्या पत्रकार ब्युरो चीफ प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleजिल्हा परिषद शाळा पालेखुर्द ला मिळाली नवसंजीवनी
Next articleनाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून तपास काढला.. नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. दिग्विजय आहेर साहेब नवे तपास अधिकारी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here