Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून तपास काढला.. नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री....

नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून तपास काढला.. नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. दिग्विजय आहेर साहेब नवे तपास अधिकारी.

370
0

राजेंद्र पाटील राऊत

NDCC बँक घोटाळा…
नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून तपास काढला..
नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. दिग्विजय आहेर साहेब नवे तपास अधिकारी…
शिवसंग्राम युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची माहीती…
– (युवराज देवरे प्रतिनिधी/युवा मराठा न्युज नेटवर्क)

NDCC बँकेच्या 300 लाख रुपये घोटाळ्याचा तपास नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून काढला असून सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे साहेब,पुणे व नाशिक विभागीय सह निबंधक सौ. लाठकर यांनी पारदर्शक तपास होण्यासाठी अहमद नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. दिग्विजय आहेर साहेब यांची
नवे तपास अधिकारी म्हणुननियुक्ती केली आहे. घोटाळ्याची व्याप्ती मोठी व जिल्हाभर असल्याने सहाय्यक म्हणुन हवेत तितके अधिकारी व कर्मचारी नेमण्याची तपास अधिकाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.
यात जिल्हा बँकेसह जिल्हाभरातील जवळपास 300 विविध कार्यकारी सोसायट्या, त्यांचे गट सचिव यांचीही चौकशी करण्याचे तसेच याविषयी लेखा परीक्षण करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी, ठेवीदार व पगारदार यांच्या हक्काचे लाखो रुपये बँकेत असतांना फक्त 5 हजाराची रक्कम देण्यात येते* आणि जिल्हाभरातील गटसचिवांना नियमबाह्य़ पद्धतीने पगाराच्या व्यतिरिक्त सानुग्रह अनुदान म्हणुन प्रत्येकी 2 महिन्यांचे एकत्रित पगार इतकी रक्कम देण्यात आली व त्यातील अर्धी रक्कम बँकेचे शेतकरी नियुक्त पदाधिकारी, काही संचालकांनी व सहकार विभागातील जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने आपसात वाटून घेतल्याचे पुरावे हाती लागले आहेत.

असे घोटाळे व भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँकेचे संचालक व कार्यकारी सोसायट्यांचे संचालक निवडतांना भ्रष्ट मनाच्या लोकांना पैसे घेवुन मत न देता. चांगल्या व प्रामाणिक लोकांना निवडून द्यावे, असे आवाहन उदयकुमार आहेर यांनी केले आहे.

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकरी व ठेवीदारांमधून करण्यात येत आहे.

Previous articleयुवा मराठा न्युजचे संपादक राजेंद्र पवार यांची नाशिक जिल्हा ग्रंथालय सेलच्या मालेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
Next articleटेंभुर्णीत १८ ते ४४ मधील २०० जणांचे लसीकरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here