Home बीड १० हजाराची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना बेड्या

१० हजाराची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना बेड्या

56
0

आशाताई बच्छाव

IMG_20240127_060204.jpg

१० हजाराची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना बेड्या

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:२६ रोजी तलावात गेलेला जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रुपयाची लाच मागितली. हीच लाच एक निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशीही महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ०५ लाख ६८ हजार ९६५ रुपये एवढा मावेजा मिळाला. यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतु उपजिल्हाधिकारी भारती साखरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रुपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलूचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने गुरुवारी दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सागरे यांनीच वसुलीसाठी नेमलेला सेवा निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे (रा.अंबाजोगाई) यांच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्र अप्पर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब भाचेवाड, सहाय्यक सापळा अधिकारी अमोल धस, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भारत गारदे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली.

सलग दुसऱ्या दिवशीही मोठी कार्यवाही

माजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील लिपिक वैभव जाधव व अश्फाक शेख या दोघांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रुपयाची लाच घेताना बुधवारी रंगेहात पकडले होते. यातही माजलगाव च्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना संसयाच्या भोवऱ्यात आहेत. त्या पाठोपाठ गुरुवारी लगेच बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे व खाजगी इसमास पकडण्यात आले. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Previous articleआश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने ध्वजारोहण संपन्न
Next articleकृषी प्रदर्शनाकरिता जाणाऱ्या ऑटोचा अपघात उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू तर पती जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here