Home भंडारा स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता बीटीबी किसान प्रोड्युसर कं. लि. भंडाराचे भूमिपूजन...

स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता बीटीबी किसान प्रोड्युसर कं. लि. भंडाराचे भूमिपूजन सोहळा संपन्न…

46
0

*स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता बीटीबी किसान प्रोड्युसर कं. लि. भंडाराचे भूमिपूजन सोहळा संपन्न......* संजीव भांबोरे भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) दिनांक १७ जानेवारी २०२४ ला मौजा शहापूर ता. जि. भंडारा येथिल *बीटीबी किसान प्रोड्युसर कंपनी लि. भंडारा शेतकरी उत्पादक कंपनीचा भूमिपूजन सोहळा मा.चिखले मॅडम प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.* *स्मार्ट प्रकल्प हा एक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी वरदान आहे .* शेतकऱ्यांनी केवळ शेतकरी न राहता उद्योजक बनावं असे प्रतिपादन केले. भंडारा जिल्हा हा वैविध्यपूर्ण नटलेला असून जिल्ह्यात फक्त आणि फक्त भात शेतीच होते असे म्हटले जाते परंतु प्रत्यक्षात बघता या जिल्ह्यात उच्च प्रतीचा आणि चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला उत्पादित होतो आणि विशेषतः कोरोनासारख्या महामारीत *BTB सब्जी भाजी मार्केटमधू* सम्पूर्ण देशात भाजीपाला पुरवठा करून भाजीपाल्याची गरज भागविली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी जागतिक बँक अर्थ सहाय्यीत मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यावसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प(SMART)अंतर्गत या,कंपनीचे भाजीपाला संकलन,प्रतवारी, साठवणूक आणि पॅकेजिंग व निर्यात असा प्रकल्प उभारून विदर्भातील दुसरी सह्याद्री म्हणून पाहण्यास हरकत नाही असे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. *बाजाराभिमूख भाजीपाला लागवड...* कार्यक्रमाला उपस्थित अजयकुमार राऊत सर प्रकल्प उपसंचालक आत्मा, भंडारा यांनी नागपुरातील कळमना मार्केट चा उदाहरण उपस्थितांना देऊन कळमना मार्केमध्ये बाहेरील जिल्ह्यातून नाशिक सारख्या ठिकाणाहून माल येत असतो तर आपणही आपल्या जिल्ह्यात तज्ञ मार्गदर्शकांचा, रिसोर्स फार्मर आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा उपयोग घेऊन मार्केमध्ये विकली जाणारी पिकांची लागवड करून,पीक बदल करून शेतकरी बांधवांनी आर्थिक उन्नती करावी असे प्रतिपादन केले. *जोखीम पत्करणे हाच संयोजकाचा नफा..* कार्यप्रसंगी उपस्थित मा.श्री.अविनाश कोटांगले सर सेवा निवृत्त तालुका कृषि,भंडारा यांनी उपस्थितांना शेतातील बारकावे आणि जोखीम पत्करून भाजीपाला लागवड, त्याअनुषंगाने प्रक्रिया आणि बीटीबीच्या माध्यमातून निर्यात हे एक शाश्वत आर्थिक उत्पन्न असेल असे प्रतिपादन केले. *निर्यातक्षम भाजीपाला लागवड...* बीटीबी कंपनीचे सचिव तथा हर्षदा बायोटेक चे मॅनेजिंग .सुधीरजी धकाते सर यांनी शेतकरी बांधवानी निर्यातक्षम भाजीपाला कसा असतो,त्याची गुणवत्ता कशी असायला पाहिजे यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. *गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन...* बीटीबी अध्यक्ष बंडूभाऊ बारापात्रे यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना शेतकरी बांधवानी जमीन,हवामान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या लोकल भाजीमार्केटचा अभ्यास करून,तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने भाजीपाला लागवड करावा असे मार्गदर्शन केले. *मातृभूमीला वाचवा...* तानाजी गायधने कृषि भूषण सेंद्रिय शेती यांनी उपस्थितांना जमिनीचा पोत आणि सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून, सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती,हिरवळीच्या खतांचा वापर करून मातृभूमीला जिवंत ठेवून, उत्पादनावरील खर्च कमी करावा. शेतकरी हाच शास्त्रज्ञ असून एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करावी असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीरजी धकाते सर यांनी तर सूत्रसंचालन सतिश वैरागडे तालुक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, भंडारा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रमेशजी गोमासे शेतकरी मित्र गुंथारा यांनी केले.

IMG_20240117_203103.jpg

स्मार्ट अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता बीटीबी किसान प्रोड्युसर कं. लि. भंडाराचे भूमिपूजन सोहळा संपन्न……

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) दिनांक १७ जानेवारी २०२४ ला मौजा शहापूर ता. जि. भंडारा येथिल बीटीबी किसान प्रोड्युसर कंपनी लि. भंडारा शेतकरी उत्पादक कंपनीचा भूमिपूजन सोहळा मा.चिखले मॅडम प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

स्मार्ट प्रकल्प हा एक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी वरदान आहे .

शेतकऱ्यांनी केवळ शेतकरी न राहता उद्योजक बनावं असे प्रतिपादन केले.
भंडारा जिल्हा हा वैविध्यपूर्ण नटलेला असून जिल्ह्यात फक्त आणि फक्त भात शेतीच होते असे म्हटले जाते परंतु प्रत्यक्षात बघता या जिल्ह्यात उच्च प्रतीचा आणि चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला उत्पादित होतो आणि विशेषतः कोरोनासारख्या महामारीत BTB सब्जी भाजी मार्केटमधून सम्पूर्ण देशात भाजीपाला पुरवठा करून भाजीपाल्याची गरज भागविली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी जागतिक बँक अर्थ सहाय्यीत मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यावसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प(SMART)अंतर्गत या,कंपनीचे भाजीपाला संकलन,प्रतवारी, साठवणूक आणि पॅकेजिंग व निर्यात असा प्रकल्प उभारून विदर्भातील दुसरी सह्याद्री म्हणून पाहण्यास हरकत नाही असे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

बाजाराभिमूख भाजीपाला लागवड…

कार्यक्रमाला उपस्थित अजयकुमार राऊत सर प्रकल्प उपसंचालक आत्मा, भंडारा यांनी नागपुरातील कळमना मार्केट चा उदाहरण उपस्थितांना देऊन कळमना मार्केमध्ये बाहेरील जिल्ह्यातून नाशिक सारख्या ठिकाणाहून माल येत असतो तर आपणही आपल्या जिल्ह्यात तज्ञ मार्गदर्शकांचा, रिसोर्स फार्मर आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा उपयोग घेऊन मार्केमध्ये विकली जाणारी पिकांची लागवड करून,पीक बदल करून शेतकरी बांधवांनी आर्थिक उन्नती करावी असे प्रतिपादन केले.

जोखीम पत्करणे हाच संयोजकाचा नफा..

कार्यप्रसंगी उपस्थित मा.श्री.अविनाश कोटांगले सर सेवा निवृत्त तालुका कृषि,भंडारा यांनी उपस्थितांना शेतातील बारकावे आणि जोखीम पत्करून भाजीपाला लागवड, त्याअनुषंगाने प्रक्रिया आणि बीटीबीच्या माध्यमातून निर्यात हे एक शाश्वत आर्थिक उत्पन्न असेल असे प्रतिपादन केले.

निर्यातक्षम भाजीपाला लागवड…

बीटीबी कंपनीचे सचिव तथा हर्षदा बायोटेक चे मॅनेजिंग .सुधीरजी धकाते सर यांनी शेतकरी बांधवानी निर्यातक्षम भाजीपाला कसा असतो,त्याची गुणवत्ता कशी असायला पाहिजे यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन…

बीटीबी अध्यक्ष बंडूभाऊ बारापात्रे यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना शेतकरी बांधवानी जमीन,हवामान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या लोकल भाजीमार्केटचा अभ्यास करून,तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने भाजीपाला लागवड करावा असे मार्गदर्शन केले.

मातृभूमीला वाचवा…

तानाजी गायधने कृषि भूषण सेंद्रिय शेती यांनी उपस्थितांना जमिनीचा पोत आणि सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून, सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती,हिरवळीच्या खतांचा वापर करून मातृभूमीला जिवंत ठेवून, उत्पादनावरील खर्च कमी करावा. शेतकरी हाच शास्त्रज्ञ असून एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करावी असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीरजी धकाते सर यांनी तर सूत्रसंचालन सतिश वैरागडे तालुक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, भंडारा यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार रमेशजी गोमासे शेतकरी मित्र गुंथारा यांनी केले.

Previous articleतलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक
Next articleसुमेध बुद्ध विहार एकोडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here