Home Breaking News *भंडारा महामार्गाची दुरूस्ती* *आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार ,*

*भंडारा महामार्गाची दुरूस्ती* *आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार ,*

93
0

*भंडारा महामार्गाची दुरूस्ती* *आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार ,*

*वाढीव टोलवसूली संदर्भात* *फेरलेखापरिक्षणाचे बांधकाम* *मंत्र्यांचे आदेश*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकाम खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने टोल वसूली करण्यात आली आहे. तसेच टोलवसुलीसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. प्रथमदर्शनी टोलवसूलीचा उपलबध तपशील लक्षात घेता बांधकाम खर्चापेक्षा अधिक पटीने ही रक्कम जास्त आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाने फेरलेखा तपासणी करावी , असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी दिले. विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनाच्या दालनात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बेकायदेशीररीत्या सुरू असलेली टोलवसुली, भंडारा येथे नादुरूस्त महामार्गामुळे होत असलेली गैरसोय या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची बैठक आज आयोजीत करण्यात आली. त्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी हे आदेश दिले. याप्रसंगी वैद्यकिय शिक्षणमंत्री श्री.अमित देशमुख यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अ.अ. सगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, उपसचिव राजेंद्र शहाणे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्लीचे महाव्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुलबांधणीचा कार्यारंभ आदेश १६ नोव्हेंबर,१९९८ रोजीचा असून ३२.५७ कोटी निवीदा किंमत होती. सन २००१ पासून पथकर वसुली सुरू होऊन आजपर्यंत ३५८ कोटी रुपयाची वसुली करण्यात आल्याची बाब उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. तसेच मुदतवाढीचे प्रकरण आणि बांधकाम विभागाने त्याला दिलेले आव्हान या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा तत्वावरील पथक हक्कासहचे हे प्रकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे अनुदानित आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
नागपूर-भंडारा महामार्गाची दुरुस्ती महामार्गावरील नागपूर-भंडारा हा मार्ग सन २०१५ मध्ये पूर्ण झाला, मात्र सध्या देखभाल आणि दुरूस्ती अभावी या रस्त्याची तीव्र दुर्दशा झाली आहे. रस्ता खराब असूनही टोल वसुली मात्र सुरूच आहे. ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी संबंधित विभागाच्या वेळ हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑक्टोबर अखेरपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीस सुयोग्य व्हावा, अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे लातूर शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेच्या मागणीनुसार ६ कि.मी.च्या उड्डाणपुलासह बांधण्यात यावा, जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी टळेल आणि शहरवासीयांच्या सुविधेला प्राधान्य मिळेल, यामुद्दयाकडे वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष वेधले. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उचित कार्यवाही केली जाईल असेही यावेळी स्पष्ट केले.

Previous articleबीड जिल्ह्यातील सर्व दुकाने व उपहारगृहांची नावे मराठी भाषेत देण्याचे आवाहन
Next article*मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी ची* *घोषणा* *मराठा क्रांती ठोक मोर्चा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here