• Home
  • बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने व उपहारगृहांची नावे मराठी भाषेत देण्याचे आवाहन

बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने व उपहारगृहांची नावे मराठी भाषेत देण्याचे आवाहन

बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने व उपहारगृहांची नावे मराठी भाषेत देण्याचे आवाहन

बीड, दि.२२ ; राजेश एन भांगे
जिल्ह्यातील सर्वच दुकाने,आस्थापना,वणिज्यिक संस्था, उपहारगृ हे निवासी उपाहारगृहे, इ.आस्थापना मालक-चालकांना जाहिर आवाहन करण्यात येते की,महारष्ट्र दुकाने व आस्थापना दुकाने व आस्थापना ( रोजगार व सेवाशर्तीचे विनियमन ) अधिनियम,2017 अंतर्गत नियम 35 अन्वये आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपित असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. परंतु मालक आस्थपनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच आणखी दतर भाषेतही लिहू शकतो तथापी, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.

तसेच ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुषांची किंवा गड -किल्यांची नांवे देण्यात येवू नये. जो कोणी या अधिनियमाच्या-नियमाच्या तरतूदींचा उल्लंघन करेल अशा आस्थापना चालक-मालका विरूध्द कायदेशीर करण्यात येईल याची सर्व आस्थापना चालकांनी नोंद घ्यावी असे सरकारी कामगार अधिकारी ,बीड यांनी कळविले आहे.

anews Banner

Leave A Comment