• Home
  • कोरोना संकटात चरस विकणाऱ्या तरुणाला अटक कारसह 1.46 लाखाचे चरस जप्त मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ची कारवाई

कोरोना संकटात चरस विकणाऱ्या तरुणाला अटक कारसह 1.46 लाखाचे चरस जप्त मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ची कारवाई

  1. *🛑 मुंबई : कोरोना संकटात चरस विकणाऱ्या तरुणाला अटक कारसह 1.46 लाखाचे चरस जप्त मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ची कारवाई.*🛑
    ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जून, ⭕ कोरोना संकटात डबल भावाने चरस विकणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. सदर कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 चे हवालदार प्रदीप घरत, आनंद तावडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने केली. या कारवाईदरम्यान अडीज लाखांची कार व 1 लाख 46 हजार रुपयांचा 730 ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याचे कक्ष 8 च्या पथकाने सांगितले.
कोरोना संकटात गैरधंद्यांना उधाण येऊ नये म्हणून सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्ताेगी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सर्व पथकांना कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गैरधंद्यांवर लक्ष ठेवून असताना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 च्या पथकातील हवालदार प्रदीप घरत, आनंद तावडे यांना अंधेरी परिसरात चरस विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कक्ष 8 च्या पथकाने भवनस कॉलेज येथे सापळा लावला. त्यावेळी कारमधून आलेल्या अब्दुल वाहिद कादर शेख (28) याला ताब्यात घेतेल. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 730 ग्रॅम चरस आढळून आले. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात (विशेष स्थानिक गुन्हे रिज. क्र. 56/2020 व गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ने विशेष स्थानिक गुन्हे रजि. क्र.18/2020) एनडीपीएस कायदा कलम 8 क, 20 ब नुसार गुन्हा दाखल करून अब्दूल वाहिद कादर शेख याला अटक करण्यात आली.
सदर चरस ठाणे रेल्वे स्थानक येथे साथीदाराकडून घेतल्याचे शेख याने सांगितले. कोरोना संकट सर्वत्र बंद असल्याचा गैरफायदा शेख डबल भावाने (10 ग्रॅमची किंमत 1 हजार रुपये) अर्थात 10 ग्रॅम चरस 2 हजार रुपयांत विकणार होता, अशी माहिती चौकशीदरम्यान उघडकीस आल्याचे कक्ष 8 च्या पथकाने सांगितले.
कोरोना संकट चरस विक्रीचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण 1 उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे, कक्ष 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय जोशी, पोलीस निरीक्षक महेश तोगडवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, हवालदार प्रदीप घरत, आनंद तावडे, साळवी, भगत, पोलीस शिपाई घाडगे आदी पथकाने
उघडकीस आणला.⭕

anews Banner

Leave A Comment