Home Breaking News परवानगी मिळूनही वृत्तपत्र घरी आलीच नाहीत

परवानगी मिळूनही वृत्तपत्र घरी आलीच नाहीत

74
0

🛑 परवानगी मिळूनही वृत्तपत्र घरी आलीच नाहीत कारण 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जून : ⭕ लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची सुरूवात झाल्यावर देत महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. आजपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजपासून नागरिकांच्या घरात वृत्तपत्र येणं अपेक्षीत होतं मात्र अनेक घरात वर्तमानपत्रेच आज मिळालेली नाहीये.

देशात मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा परिणाम वर्तमानपत्राच्या वितरणावर झाला. कारण वर्तमानपत्रांच्या माध्यमातूनही कोरोनाच्या विषाणूची लागण होत असल्याची अफवा पसरली होती. याचा परिणाम वृत्तपत्र वितरणावर झाला. त्यामुळं घरोघरी पेपरचे वितरण थांबवण्यात आले होते. कालांतरानं वर्तमानपत्रातून विषाणूचा फैलाव होत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. त्यामुळं ही भीती दूर झाली. तरीही वर्तमानपत्रांचं वितरण करणाऱ्या गरीब मुलांच्या आरोग्याशी तजजोड न करण्याची भूमिका घेत राज्य सरकारनं घरोघरी पेपर देण्यावर निर्बंध कायम ठेवले. त्यामुळे आत्तापर्यंत केवळ स्टॉलवरच वर्तमानपत्रे मिळत होती. मात्र लॉकडाऊन ५ मध्ये हा नियम शिथील करण्यात आला. त्यामुळं आता घरोघरी वाचकांना पेपर वाचायला मिळणार आहेत.

खरतर आजपासून वर्तमानपत्र घरी येणं अपेक्षीत होतं. मात्र आज अनेकांना घऱात वर्तमानपत्रच मिळालेले नाहीये. आज पहिल्या दिवशी खूपच कमी घरांमध्ये वर्तमानपत्र आले आहे. यावर बोलताना वर्तमानपत्र वितरक म्हणाले की, लाइन टाकणारी मुलं आपापल्या गावाकडं निघून गेली असल्यामुळे वर्तमानपत्र घरात आली नाहीत. जी मुलं इथे आहेत, ती भीतीपोटी अजूनही पेपर टाकण्यास तयार होत नसल्याचं वितरकांचं म्हणणं आहे.⭕

Previous articleकोरोना संकटात चरस विकणाऱ्या तरुणाला अटक कारसह 1.46 लाखाचे चरस जप्त मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ची कारवाई
Next articleजिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) स्वॅब तपासणी (व्हि. आर. डी. एल.) प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री मा. धनंजय मुंडें हस्ते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here