*पेठ वडगांव मराठा नगर मध्ये* *शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.*
कोल्हापूर ,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव शहरामध्ये मराठा नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सद्ध्या लाॅकडाॅऊन असलेने रायगडावरती मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करता येत नसल्याने आप आपल्या गावामध्ये छोट्या प्रमाणात का असेना पण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा युवा पिढी करत आहेत.
मराठा नगर मधील युवा उद्योजक विशाल सादळे,सचिन सलगर, कार्तिक डेकोरेशन चे युवा उद्योजक किरण पाटील, सोनू शिंदे, पृथ्वीराज पाटील, सुशांत पाटील, मनोज कोठारी,ओंकार पाटील, शिवम वडींगेकर,देवराज गंथडे, हर्षवर्धन मांगलेकर, गार्गी शिंदे इत्यादी उपस्थित होते.
