Home Breaking News बाप रे बाप” बाप लेकाच्या आंगावर घातली जेसीबी बाप जागीच ठार

बाप रे बाप” बाप लेकाच्या आंगावर घातली जेसीबी बाप जागीच ठार

131
0

*बाप रे बाप” बाप लेकाच्या आंगावर घातली जेसीबी बाप जागीच ठार* बीडः(प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
-गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील शेतात पाईपलाईनचे काम चालू असताना बाजूला झोपलेल्या बाप लेकाच्या अंगावर जेसीबी गेल्याने यात बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि -7 जुन रविवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर असलेल्या मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू होते.
साहेबराव रूपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज राठोड हे बाजूला जाऊन झोपले होते. मात्र काम चालू असताना चालकाच्या लक्षात न आल्याने ते दोघेही जेसीबीच्या खाली आले यात साहेबराव रूपा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा मनोज साहेबराव राठोड गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तलवाडा पोलीस दाखल झाले असून जेसीबी चालक जेसीबी घेऊन फरार होण्यास यशस्वी झाला आहे

Previous articleमालाडकरांमध्ये संसर्ग पसरला कारण…
Next articleपेठ वडगांव मराठा नगर मध्ये* *शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here