Home जळगाव ATM मधील कॅशचा अपहार करणारे आरोपीकडून 19 लाख 42 हजार मुद्देमाल जप्त…

ATM मधील कॅशचा अपहार करणारे आरोपीकडून 19 लाख 42 हजार मुद्देमाल जप्त…

42
0

आशाताई बच्छाव

IMG_20231231_060649.jpg

ATM मधील कॅशचा अपहार करणारे आरोपीकडून
19 लाख 42 हजार मुद्देमाल जप्त…

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- खाजगी कंपनिमार्फत कस्टोडीयन म्हणून बँकामधून कॅश काढून ATM मशीनमध्ये भरण्याचे काम करणाऱ्या दोघांनी 64 लाख 82 हजार 200 रुपयांचा अपहार केला होता व नियंत्रण ठेवणे व ऑडीटर म्हणुन नेमलेल्या ऑडिटर ने खोटे ऑडिट तयार करून कंपनीला पाठवले होते
व एकाने त्यातील रक्कम घेतल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल होता चाळीसगाव शहर पोलिसांनी तपास करून त्यातील अपहार केलेल्या रक्कमेतुन घेतलेली मोटर कार रोख रक्कम व सोन्याची दागिने असा एकुण 19 लाख 42 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी प्रविण देविदास गुरव 38, दिपक भिकन पवार 34 दोघे रा. पाटणदेवी रोड आदित्यनगर चाळीसगाव यांनी
सिक्युर हॅल्यु इंडीया लिमीटेड या खाजगी कंपनिमार्फत कस्टोडीयन म्हणून बँकामधून कॅश काढून ATM मशीनमध्ये न भरता मे ते डिसेंबर 23 दरम्यान व थोड़ी-थोडी करुन एकुण 64 लाख 82 हजार 200 रुपयांचा अपहार केला होता
व राजेंद्र वाल्मिक चौधरी रा चाळीसगाव यास 14 लाख दिले होते तर ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव 43 रा. गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्ती नगर जळगाव यांचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरन 576/23 भादवी कलम 408, 409, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, पोलीस नाईक महेंद्र पाटील, दिपक पाटील, कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के, ज्ञानेश्वर पाटोळे, विनोद खैरणार, आशुतोष सोनवणे, अमोल भोसले व महिला कॉन्स्टेबल सबा शेख यांनी
आरोपी प्रविण देविदास गुरव, दिपक भिकन पवार, चंद्रशेखर एकनाथ गुरव यांना अटक केल्यावर 19/12/23 ते 30/12/23 पर्यंत पोलीस कोठडीत असताना त्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोटार कार असा एकूण 19 लाख 42 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.
गुन्हातील अपहार केलेली उर्वरीत रक्कम ज्यांना दिली आहे त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तपासी अधिकारी उपनिरीक्षक सुहास आव्हाड, कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के यांनी दिली आहे.

Previous articleपहेला ते चिखलपहेला डांबरीकरण रस्त्याची दयनीय अवस्था ,रस्ता तात्काळ दुरुस्त करा –उपसरपंच मनोज शहारे
Next articleगिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here