Home जळगाव गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण….

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण….

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20231231_061020.jpg

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण….

आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीची राज्य शासनाने घेतली दखल….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील– गेल्या अनेक वर्षांची मागणी असणाऱ्या व मन्याड खोऱ्यातील २५ गावांना संजीवनी ठरणाऱ्या गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आज दि.३० डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्याकडे सदर सर्वेक्षणाची मागणी केली होती, त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले असता जलसंपदा विभागाच्या वतीने तातडीने हे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली झाल्या.
प्राथमिक सर्वेक्षणात गिरणा धरणातून नैसर्गिक प्रवाहाने मन्याड धरणात पाणी आणणे शक्य असल्याचा निष्कर्ष जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी काढला आहे. यामुळे एक सकारात्मक पाऊल नदीजोड च्या दिशेने पडले आहे.
सदर सर्वेक्षणात जलसंपदा विभागाच्या स्थापत्य शाखेचे उपअभियंता अश्वजित बच्छाव व
कनिष्ठ अभियंता क्षितिज चौधरी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र शिवराम पाटील,
ज्ञानेश्वर पाटील, अप्पा पाटील, नाना पाटील, चेतन पाटील आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
गिरणा धरण हे मन्याड पेक्षा २८ मीटर उंच आहे. त्यामुळे मन्याड धरणात नैसर्गिक प्रवाहाने पाणी येणे शक्य आहे. गिरणा धरणाच्या रोहिणी व डोणदिगर १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जॅकवेल जवळील जागा व मन्याड धरणाच्या डाव्या बाजूला नांदगाव रोड जवळील जागा याचे अंतर जवळपास ८ किमी आहे.
प्राथमिक सर्वेक्षण अहवाल दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने डिटेल सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Previous articleATM मधील कॅशचा अपहार करणारे आरोपीकडून 19 लाख 42 हजार मुद्देमाल जप्त…
Next articleजयश्री पांचाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्षा पदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here