Home युवा मराठा विशेष ‘मराठा-कुणबी’ युवकांसाठी यश कॉम्प्युटर्स सटाणा येथे मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम;सारथी व एमकेसीएल...

‘मराठा-कुणबी’ युवकांसाठी यश कॉम्प्युटर्स सटाणा येथे मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम;सारथी व एमकेसीएल चा पुढाकार

142
0

आशाताई बच्छाव

IMG-20230128-WA0014.jpg

‘मराठा-कुणबी’ युवकांसाठी यश कॉम्प्युटर्स सटाणा येथे मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम;सारथी व एमकेसीएल चा पुढाकार

मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मराठा-कुणबी युवक-युवतींना रोजगारभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी ‘सारथी’ व ‘एमकेसीएल’ यांच्या माध्यमातुन सीएसएमएस-डीईईसी (छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक मोफत अभ्यासक्रम) राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन www.mkcl.org/csmsdeep या संकेत स्थळावर किंवा यश कॉम्प्युटर्स सटाणा यांच्याकडे २७ जानेवारी २०२३ च्या आत नाव नोंदणी करावी, असे आवाहन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक श्री. सुभाष पाटील, मकरंद बेळगावकर यांनी केले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठ-कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी हा अभ्यासक्रम मोफत आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असुन १० हजार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण एमकेसीएलच्या यश कॉम्प्युटर्स, सटाणा कोर्टा समोर, नेहरु रोड, सटाणा केंद्रामार्फत दिले जाईल. १६ जानेवारीपासुन नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिध्द होणार आहे.
हे प्रशिक्षण १ फेब्रुवारीपासुन सुरु होत आहे. सरकारच्या माध्यमातुन या समाजातील युवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. स्वयंरोजगार क्षमता वाढविणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरुन काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विशिष्ठ डिजिटल कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवुन स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधीसाठी तरुणांना विकसित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे ४ मॉड्युल असतील. कार्यक्रम कालावधी ४८० तासांचा असुन सहा महिन्यांमध्ये हा कार्यक्रम मोफत पुर्ण करणार आहे.

| आगामी काळात त्याचा चांगला फायदा युवक युवतींना होणार आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभा घ्याव असे आवाहन यश कॉम्प्युटर्स संचालक योगेश आहिरे यांनी केले आहे.
आवश्यक पात्रता :
उमेदवाराचे वय १८ ते ४५
दहावी पास
पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी
महाराष्ट्रातील रहिवासी.

Previous articleशाळा प्रवेशासाठी ‘आधार’ सक्ती; बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
Next articleविश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here