Home भंडारा पहेला ते चिखलपहेला डांबरीकरण रस्त्याची दयनीय अवस्था ,रस्ता तात्काळ दुरुस्त करा –उपसरपंच...

पहेला ते चिखलपहेला डांबरीकरण रस्त्याची दयनीय अवस्था ,रस्ता तात्काळ दुरुस्त करा –उपसरपंच मनोज शहारे

85
0

आशाताई बच्छाव

IMG_20231231_060208.jpg

पहेला ते चिखलपहेला डांबरीकरण रस्त्याची दयनीय अवस्था ,रस्ता तात्काळ दुरुस्त करा –उपसरपंच मनोज शहारे

अन्यथा चक्काजाम आंदोलन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा तालुक्यातील पहेला ते चिखलपहेला या दोन किलोमीटर डांबरीकरण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून हा रस्ता पूर्ण उकडलेला असून ठीक ठिकाणी गिट्टी उघडलेली आढळून येत आहे .या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. बारिश मध्ये खड्ड्यामध्ये पाणी साचत असतो .रस्त्यावरून टू व्हीलर गाडी सोबतच सायकल सुद्धा चालवणे अवघड झालेले आहे. रात्री बे रात्री दवाखान्यात आजारी व्यक्तीला आणायचे म्हटले की तारेवरची कसरत करावी लागते. रात्री रस्त्याने समोरून कुणी आले तर गाडी कुठून टाकावी हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून पहेला ते चिखलपहेला या दोन किलोमीटर उकडलेल्या डांबरीकरण रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे चिखलपहेला येथील उपसरपंच मनोज शहारे व नागरिकांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here