Home जालना गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज ——

गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज ——

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20231223_060646.jpg

गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज —————————————-
संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण @ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ————————————–
जालना(दिलीप बोंडे)रक्तदान,देहदान,अवयवदान आणि नेत्रदानातच देवाचे देवत्व आहे.देव हा बाजारातला भाजीपाला नाही.रंजल्या,गांजलेले आणि अपंगाची सेवा करून त्यांना अन्नदान करण्यामध्येच खरा आनंद असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सप्त खंजेरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी येथे बोलतांना केले.
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त जालना येथील डेबूजी परिवार आणि गुरू शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जुना जालना भागातील महालक्ष्मी मंदिरात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी परिट समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव वाघमारे,प्रदेश उपाध्यक्ष मोहन इंगळे,जिल्हाध्यक्ष किशोर आगळे,डेबूजी व गुरू शिष्य परिवाराचे प्रमुख आदर्श शिक्षक किशोर खंडाळे,वसंतराव राऊत,गणेशराव इंगळे,अनिल खंडाळे,सुभाष घोडके,काशिनाथ मेव्हणकर,कैलास वाघमारे,संतोष शिंदे,रमेश पैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना सत्यपाल महाराज महणाले की,गाडगे बाबा निघून गेले याचे दुःख नाही. जो आपल्यासाठी जगतो, ते जगणे नाही ! आणि जो सेवेत मरतो, तो मरत नाही !! अशा शब्दात गाडगे बाबा यांच्या कार्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, रक्तदान,अवयवदान,देहदान,नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांना आपण स्वतः नेहमीच प्राधान्य देतो.आपण स्वतःच्या पत्नीचे,आई आणि वडिलांचे देहदान दिल्याचे सांगून  ” मंदिरी बसुनी नाक दाबावे, त्यापेक्षा रस्त्यावरचे काटे उचलावे ” असा संदेश गाडगे बाबांनी आम्हाला दिला आहे.गाडगे बाबा यांनी फक्त गाव स्वच्छ केली नाही

Previous articleयुवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजित दादा गटाचे नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष पदी घोगरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here