Home बुलढाणा युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20231203-WA0210.jpg

युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

संग्रामपूर ः- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्यातील युवा मराठा न्यूजचे सहसंपादक स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्यानिमित्त पत्रकारांचे वतीने संग्रामपूर येथील विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला.व आवाहन केल्यानुसार प्रत्येकी एक रुपया प्रमाणे रक्कम प्रदान करण्यात आली.
सन २०१८ पासून बापूसाहेब युवा मराठा न्यूज चॅनलच्या नेटवर्क मध्ये एकनिष्ठ व प्रामाणिक म्हणून कार्यरत आहेत.आजवर देशमुख यांनी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील नागरिकांना युवा मराठा परिवारात सहभागी करून घेतले आहे.तर मध्यंतरी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील बरेच कुटुंबातील घरादाराचे नुकसान होण्यासोबतच घरातील अत्यावश्यक जीवनसामग्री या पुरात वाहून गेल्याने, स्वप्नील देशमुख यांनी क्षणाची उसंत न घेता युवा मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे व बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष सौ.उमाताई बोचरे यांच्या सहकार्याने पुरग्रस्तांना थेट घरपोच किराणा किट पोहच करून महासंघाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केला म्हणून स्वप्नील देशमुख यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे दिनांक १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून,या बैठकीला युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष विजय पवार, युवा मराठाचे प्रविण क्षीरसागर, प्रमोद पवार, आंशूराज पाटील राऊत,व मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी युवा मराठा महासंघाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष विजय पवार यांनी स्वप्नील देशमुख यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन महासंघाचे कार्य वाढविण्यासाठी शुभकामना बहाल केल्यात.तर विजय पवार यांना महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आल्याचे यावेळी घोषीत करण्यात आले. नव्यानेच नियुक्ती झाल्याबाद्दल स्वप्नील देशमुख यांचा पत्रकारांचे वतीने आज दि.२२/डिसेंबर रोजी विश्रामगृह संग्रामपूर येथे सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देतांना देशमुख म्हणाले मला फक्त युवा मराठा संघासाठी प्रत्येकी फक्त एक रुपया मदत करा.त्याचा उपयोग मी सत्कर्मासाठी करेन.यावर लगेच उपस्थित पत्रकार व काही राजकीय पदाधिकारी यांनी एक रुपया मदत करुन ११रुपये प्रदान करण्यात आले.
ह्यावेळी जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी,युवा मराठा संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा पत्रकार ज्ञानेश्वर दांदळे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण निंबोळकार,निलेश तायडे, विश्रामगृहाचे वानखडे, पत्रकार दयालसिंग चव्हाण,विवेक राऊत,सुनिल मुकुंद आदी पत्रकार ,काही कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्याच वेळी मा.प्रतापराव जाधव खासदार ह्यांनी भ्रमणध्वनी द्वारे स्वप्नील देशमुख यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यात.
[महासंघाचा व न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीचा लवकरच राज्यस्तरीय मेळावा
युवा मराठा महासंघाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील (बापूसाहेब) देशमुख यांनी विदर्भातल्या संतनगरी शेगांव येथे महासंघाचा व न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीचा राज्यस्तरीय मेळावा घेतला जाईल]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here