• Home
  • *कौळाणेत राजकारण पाण्याचे जनता मात्र तहानलेलीच….!!*

*कौळाणेत राजकारण पाण्याचे जनता मात्र तहानलेलीच….!!*

*कौळाणेत राजकारण पाण्याचे जनता मात्र तहानलेलीच….!!*
*मालेगांव,(कार्यालय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* मालेगांव तालुक्यातल्या कौळाणे (निं) गावात पाण्याची सगळ्यात मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.छपन्न गाव पाणी पुरवठयाची योजना मात्र नावालाच आहे,कधी तरीच पाणी येते.तरीही ग्रामपंचायतीकडून भरमसाठ पाणीपट्टीच्या नावाखाली वसुली केली जाते.प्रत्यक्षात गावाला प्यायलाच पाणी उपलब्ध करु न शकणाऱ्या ग्रामपंचायतीला पाणीपट्टी वसूलीचा नैतिक अधिकार तरी कसा मिळू शकतो?हा देखील एक संशोधनाचाच विषय ठरतो.कौळाणे (निं)गावाला कायमस्वरुपी पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गिरणा नदीजवळच्या एका विहीरीवरुन गावासाठी लाखो रुपये खर्च करुन पाईपलाईनीची योजना राबविण्यात आली.सदरची योजना हि तत्कालीन ग्रामसेवक के.सी.अहिरे व सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांच्या कारकिर्दीत राबविली गेली. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पाईपलाईन कामावर पाण्यासारखाच अफाट खर्च झाल्याचे दाखविण्यात आले.मात्र झालेला खर्च हा पाण्यातच गेला.गावाला काही कायमस्वरुपी प्यायला पाणी मिळू शकले नाही.”नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न”याप्रमाणेच हि पाणीपुरवठा पाईपलाईन योजना वादग्रस्त ठरली,अनेक आर.टी.आय.कार्यकर्त्यानी हा मुद्दा उचचलून धरला.आणि आपल्याच स्वतःच्या तुंबडया भरुन घेण्याबरोबरच खिसे गरम केल्याच्याही चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.मात्र मुळ प्रश्न हा आहे की,कौळाणेत राजकारण पाण्याचे खेळले जात असले तरी दुसऱ्या बाजुला मात्र नागरिकांना भर पावसाळ्यातच विकतचे पाणी पिण्यासाठी विकत घेऊन प्यावे लागत आहे.यापेक्षा वाईट व भयंकर दुर्दैवी गोष्ट ती आणखी कोणती असू शकते?फक्त दलालखोरीत व टक्केवारीत गुरफटलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी वर्गाने ग्रामसेवक के. सी.अहिरे सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांच्या संगनमताने गावाची पुरती वाट लावून ठेवलेली आहे.तरीही नागरिकांकडून भरमसाठ पाणीपट्टी वसुल करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कसा मिळू शकतो?असाच गहन प्रश्न सध्या कौळाणेवासियांना सतावत आहे,याची झाडाझडती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याबरोबरच प्रशासक सुनील बच्छाव यांनीही एकदा या पाणीयोजनेचे लाखो रुपये पाण्यात गेलेतच कसे?याचा पंचनामा करावाच अशीच अपेक्षा कौळाणेवासियांची आहे.
*(उद्या वाचा-दलालखोरी व टक्केवारीत विकासकामांचे केले ग्रामपंचायतीने वाटोळे)*

anews Banner

Leave A Comment