Home जालना ब्राम्हण समाजाच्या रास्त मागण्या सोडविण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे – अशोक पांगारकर ———–

ब्राम्हण समाजाच्या रास्त मागण्या सोडविण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे – अशोक पांगारकर ———–

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20231206_070714.jpg

ब्राम्हण समाजाच्या रास्त मागण्या सोडविण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे – अशोक पांगारकर —————————————-
ब्राम्हण समाजाच्या उपोषणाला सकल तेली समाजाचा पाठिंबा
—————————————– जालना(दिलीप बोंडे)जालना जिल्ह्यासह राज्यातील ब्राम्हण समाजाच्या मागण्या रास्त असून सदर मागण्या राज्य सरकारने प्राधान्याने मार्गी लावाव्यात अशी आग्रही मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सकल तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर यांनी केली आहे.
राज्यातील ब्राम्हण समाजाच्या उत्कर्षासाठी परशूराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या आणि अन्य  मागण्यासाठी सकल ब्राम्हण समाज संघर्ष समितीतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात दीपक रणनवरे यांनी दि.२८ नोव्हेंबर पासून जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या या उपोषणाला अशोक पांगारकर यांच्यासह मोहन अबोल,राजेंद्र वाघमारे,अजय मिसाळ,दत्तात्रय राऊत,प्रकाश राऊत,विश्वनाथ क्षीरसागर,जनार्दन व्यवहारे,संदीप सुरळे,संतोष शिंदे,गणेश लगडे,गणेश आरकर,विनोद भोजराज,विकास बोंदरे,प्रसाद सोनवणे,मंगेश गव्हारे,मनोज डोंगरे,राहुल काळे आदी पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी दुपारी उपोषणस्थळी भेट देवून दीपक रणनवरे यांना सकल तेली समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.तेली समाजाच्या बैठकीत उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून ब्राम्हण समाज हा आपल्या विविध मागण्यांसाठी मागील अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असताना या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.ब्राम्हण समाजाच्या मागण्या रास्त असल्याने राज्यातील सरकारने सदर मागण्या सोडविण्यासाठी प्राधान्याने पाऊल उचलावे अशी मागणी अशोक पांगारकर यांनी केली आहे.

Previous articleदीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे   जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भूमिका ठरली महत्त्वाची
Next articleबी. एस. फोर्सच्या शहराध्यक्षपदी कांबळे, शहर महासचिवपदी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here