Home जालना दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे   जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची...

दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे   जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भूमिका ठरली महत्त्वाची

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20231206_070234.jpg

दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भूमिका ठरली महत्त्वाची
जालना दिलीप बोंडे- परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून गांधी चौकात अन्नत्याग उपोषणास बसलेले दीपक रणनवरे यांनी मंगळवारी ( दि. 5)  दुपारी आपले उपोषण मागे घेतले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भूमिका यावेळी महत्त्वाची ठरली.
परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सकल ब्राह्मण समाज संघर्ष समन्वय समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिनांक 28 नोव्हेंबर पासून जालना शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. या उपोषणास लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. गेल्या आठ दिवसापासून अन्नत्याग उपोषणास बसलेले  दीपक रणनवरे यांची प्रकृती खालावली होती.
पालकमंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेऊन उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या मागण्यासंदर्भात दिनांक 13 डिसेंबर रोजी नागपूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्याबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मंगळवारी ( दि. 5) दुपारी उपोषणस्थळी येत उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांना दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, नगरसेवक अशोक पांगारकर, तहसीलदार छाया पवार  आदींची उपस्थिती होती. यांच्यासह हभप नानामहाराज पोखरीकर, भास्करमहाराज देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना उपोषणकर्ते दीपक रणनवरे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून समस्त  ब्राह्मण समाज हा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी करीत आहे. मात्र शासनाने आश्वसनाशिवाय काही एक दिलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here