Home नांदेड बेल भांडा- याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषनेने माळेगाव यात्रा...

बेल भांडा- याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषनेने माळेगाव यात्रा सुरु

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_080117.jpg

बेल भांडा- याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषनेने माळेगाव यात्रा सुरु

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडेराया माळेगाव यात्रेस दिं. १० जानेवारी रोजी बुधवारी प्रारंभ झाला. येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेल भंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबारायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला. प्रारंभी मनाच्या पालखीने नगर प्रदक्षिणा घालून देवस्वारी काढण्यात आली. पालखी मार्गावर लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे यावर्षीही माळेगाव शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मानकऱ्याना मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व मानधन देवून सन्मान करण्‍यात आला.
प्रारंभी सकाळी श्री खंडोबा मंदिरात खंडेरायाची शासकीय महापुजा करण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देवस्‍वारी काढण्‍यात आली. पालखी समोर वाघ्या, मुरळी, मानकरी होते. शासकीय विश्रामगृह येथे पालखी देवस्वरी येताच उपस्थितांनी दर्शन घेतले. तसेच प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते मानकऱ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,
जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माळेगावच्या सरपंच कमलबाई धुळगंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकल्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजूषा कापसे, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, अमित राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे- चिखलीकर, चंद्रसेन पाटील, पुरुषोत्तम धोंडगे, व्ही. आर. बेतीवार, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, रोहित शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार प्रसाद लाड, गट विकास अधिकारी अडेराघो
आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या वतीने मानक-यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्‍यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्‍हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकंदंडे (आष्टुर) या मानक-यांचा फेटा बांधून व शाल श्रीफळ देवून त्यांचा गौरव करण्‍यात आला.
खंडोबा यात्रेत वाघ्‍या-मुरळी हे
“उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे.. गड जेजूरी उत्‍तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी” असा घोष करत होते. वाघ्‍या मुरळी पारंपारीक पध्‍दतीने कवडयाच्‍या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करत असतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविक तसेच हौशे नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली.

Previous articleनेवासा फाटा येथे पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न
Next articleतलाठी भरती घोटाळ्याची चौकशी करा . युवक काँग्रेस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here