Home उतर महाराष्ट्र नेवासा फाटा येथे पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

नेवासा फाटा येथे पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

290
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_075723.jpg

नेवासा -अहमदनगर कारभारी गव्हाणे                  मंगळवार रोजी नेवासा फाटा येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील व नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी तालुक्यातील नेवासा प्रेस क्लब व त्यांचे सर्व सदस्य नेवासा एकता पत्रकार संघ व त्यांचे सर्व सदस्य, सोनई प्रेस क्लब व त्यांचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत काल सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्याप्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पत्रकारांच्या वतीने बोलताना नेवासा प्रेस क्लबचे संस्थापकअध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे , बाळासाहेब देवखिळे बाळासाहेब पिसाळ एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित यांनी आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे गुरुप्रसाद देशपांडे बाळकृष्ण पुरोहित प्रमुख उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रताप भाऊ चिंधे, भाजप मीडिया संयोजक प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व याप्रसंगी या ऋषिकेश शेटे यांनी तालुक्यातील चाललेली परिस्थिती, पत्रकारांच्या समोर व्यक्त केली लोकशाहीचा चौथा स्तंभ व पत्रकार या नात्याने तुम्ही सर्व खरी परिस्थिती जनतेसमोर मांडवी अशी बोलताना म्हणाले व पत्रकारांना याप्रसंगी कुठलीही अडचण आली तर मी माझ्या परीने व भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण ताकतीने पत्रकार बांधवांच्या पाठीमागे उभे राहील अशी याप्रसंगी ग्वाही दिली त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे म्हणाले की आम्ही सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी असून आम्हाला सर्व पत्रकार बांधवांची आतापर्यंत मोलाची साथ दिली आहे आणि पुढील काळातही देतील अशी आशा यावेळी व्यक्त केली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रताप चिंधे बोलताना काय म्हणाले की आमच्या पाठीवर फक्त थाप मारून…. आम्हाला तुम्ही लढ म्हणा… तुमच्या साथीची आम्हाला गरज असून ती आपण पुढील काळात द्यावी अशी इच्छा व्यक्त केली यांनी व त्यानंतर सर्व पत्रकार व उपस्थित मान्यवरांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठलराव लंगे पाटील , किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ काळे,भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, युवा मोर्चा जिल्हा सचिव प्रताप चिंधे, भारतीय जनता पार्टीचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. बाळासाहेब कोलते शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक शेजुळ सचिन भांड प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे व ऋषिकेश शेटे पाटील मित्र मंडळ नेवासा तालुका यांचे सर्व सदस्य उपस्थित होते त्यानंतर सर्व पत्रकारांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांनी ऋषिकेश भाऊ शेटे पाटील यांचा येथोचित सन्मान केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड नेवासा फाटा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप गाडेकर सोनई प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश राऊत व उपाध्यक्ष रवींद्र शेटे यांच्यासह सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन करण्यात आला त्यानंतर सुरुची भोजनाचा आयोजन करण्यात आले होते त्यांचा सर्व पत्रकारांनी आनंद घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here