Home भंडारा लाखनी विदर्भ कोकण बँकेत संविधान दिन साजरा

लाखनी विदर्भ कोकण बँकेत संविधान दिन साजरा

74
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_175330.jpg

लाखनी विदर्भ कोकण बँकेत संविधान दिन साजरा

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) भारतीय संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. भारतीय संविधान हे चार खांबावर उभारलेले असून डॉ आंबेडकरांनी संविधान व लोकशाहीला व्यक्तिमहात्म्य तसेच जात धर्माचा धोका असल्याचे प्रतिपादित केले होते तो धोका आजही कायम आहे असे प्रतिपादन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा लाखनीच्या वतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.संविधान निर्मितीबद्दल समयोचित विस्तृत माहिती प्रा.डॉ सुरेश खोब्रागडे, ऍड. प्रशांत गणवीर, लाखनी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अमोल तांबे, सचिन उके,पवन खांडेकर,विठ्ठल मस्के इत्यादींनी विविध मार्मिक व माहितीपूर्ण उदाहरणासहित दिली.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय भंडारा अंतर्गत येणाऱ्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा
कार्यक्रम विदर्भ कोकण ग्रामीण बैंकचे क्षेत्रीय प्रबंधक पी. जी. धकाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाला डॉ. सुरेश खोब्रागडे जेष्ठ्य साहित्यिक , ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा. अशोक गायधने, लाखनी पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरिक्षक अमोल तांबे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सोनवाने, सचिन जी उके, तोशिष हर्षे , सचिव प्रगती एनजीओ, विदर्भ कोकण ग्रामीण बैंकचे क्षेत्रीय कार्यालयाचे वा.र. खरे, ॲड. श्री.प्रशांत गणवीर, पवन खांडेकर, पंकज खांडेकर, तेजेश गिरेपुंजे, मोहन बोंदरे, डॉ दीपक इलमकर, जेष्ठ्य पत्रकार भोंगाडे, विठ्ठल मस्के , सूर्यकांत गभने , नासिक बागडे उपाध्यक्ष वैशाली बौद्ध महासंघ, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, जयपाल वनवे, समीर नंदेश्वर, व्ही. जी. कापगते,भुषण जांभुळकर,
राजेश तितीरमारे, प्रसन्न उके,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक लाखनी शाखेचे प्रबंधक डी. ए. खंडेरा यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री जयपाल वनवे सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता
बँकेचे अधिकारी उप मिस स्वाती जयदे, ऑफिस असिस्टंट श्री. मनोज आडे, श्रीमती माधवी भुरले ,सूरज वाघाडे, BC श व्हि. एस. रिनाईत , शामसुंदर रहांगडाले, रविकांत मांढरे, दुली गिरेपुंजे,सतिश शहारे, बबनराव मस्के यांच्यासह परिसरातील जागृत नागरिकांनी सहकार्य केले.

Previous articleलाखनीच्या निसर्गमहोत्सवात तयार झाले ‘पर्यावरणस्नेही किल्ले’
Next articleभारतातील कोरियन राजदूतांची दुर्ग दुर्गेश्वर रायगडास भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here