Home रायगड भारतातील कोरियन राजदूतांची दुर्ग दुर्गेश्वर रायगडास भेट.

भारतातील कोरियन राजदूतांची दुर्ग दुर्गेश्वर रायगडास भेट.

63
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_185713.jpg

भारतातील कोरियन राजदूतांची दुर्ग दुर्गेश्वर रायगडास भेट.

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतातील कोरियन राजदूत श्री. चांग जे बोक त्यांच्या पत्नी व काही सहकाऱ्यांसमवेत आज स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास भेट दिली. दिल्ली. येथील दूतावासात राहणारे श्री. चांग जे बोक हे त्यांच्या पुणे प्रवासात आले होते, पुढे पोस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लि. या कोरियन कंपनीत त्यांचा सदिच्छा प्रवास नियोजित होता. वरील योजनेत पाहुण्यांची उत्कंठा ओळखून कंपनीमधील व्यवस्थापनाने श्री. चांग जे बोक यांना छत्रपतींच्या राज्याच्या राजधानीचे धावते दर्शन घडविण्याची योजना बसवत इथल्या पावन व गौरवशाली इतिहासाची छोटीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, रायगड रोप वे प्रशासन अधिकारी व स्थानिक पोलीस प्रशासनही या व्यवस्थेत जातीने हजार होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रायगड किल्ल्याविषयी तसेच चालू असलेल्या नुतनीकरणाबद्दल माहिती दिली. पोस्को कंपनीचा व्यवसाय कोरियात अत्यंत महत्वाचा सरकारी व सार्वजनिक व्यवसाय असल्याने श्री. चांग जे बोक यांची ही भेट त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची व भारतातील या व्यवसायाकरिता अत्यंत प्रेरणादायी होती.
श्री. चांग जे बोक यांनी त्यांच्या भेट अभिप्राय पर संदेशात “रायगडासारख्या अत्यंत प्रेरणादायी वास्तूचे आपण करत असलेल्या संवर्धन आणि संरक्षण कामाबद्दल आपले कौतुक व खूप खूप शुभेच्छा व मला या अत्यंत ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणाला भेट देता आली याबद्दल सर्व आयोजकांचे आभार” अशा भावपूर्ण शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Previous articleलाखनी विदर्भ कोकण बँकेत संविधान दिन साजरा
Next articleसाक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here