Home उतर महाराष्ट्र साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने...

साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने !

23160
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_195745.jpg

साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने !
धुळे/नंदुरबार (ब्युरो चीफ दिपक जाधव)- संपूर्ण धुळे जिल्हा हादरून सोडणा-या साक्री दरोडा प्रकरणी उकल झालेली असून गत २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता साक्री शहरातील विमलाबाई महाविद्यालया जवळील निलेश पाटील यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यातील मास्टर माईंड दुसरा तिसरा कुणी नसून दस्तुरखुद्द पाटील यांची भाची हिच असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसानी केलेल्या सखोल तपासा दरम्यान या घटनेचा संपूर्ण तपशील समोर आला आहे साक्री दरोडा प्रकरणी प्रियकरा सोबत फसला निशा शेवाळेचा डाव या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर हा मुळचा शाजापूर जि.शाजापूर मध्य प्रदेश हा असून तो गेल्या दोन वर्षा अगोदर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सौर उर्जा ठेकेदार म्हणून कामास होता. या कालावधीत विनोद भरत नाशिककर हा धुळे येथील आदर्शनगर मध्ये निशा शेवाळे हीच्या घराशेजारी वास्तव्यास होता.त्यानतर भरत नाशिककर हा आपल्या मुळं गावी शाजापूर जि शाजापूर मध्यप्रदेश येथे परत निघून गेला मात्र निशा शेवाळे व विनोद नाशिककर हे नियमित इंस्टाग्राम ॲपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते निशा शेवाळे हिस प्रियकर विनोद नाशिककर यांच्या समवेत पळून जायचे असल्याने हे सगळे कट कारस्थान निशा हिनेच विनोद नाशिककर यांच्या संगनमताने रचून विनोद नाशिककर याने आपले काही हरियाणा राज्यातील मित्र बोलावून घेत दिनांक २५ नोव्हेंबर रोजी साक्री शहरात दरोडा घातला.यात ज्योत्स्ना निलेश पाटील यांच्या घरातून सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल विनोद नाशिककर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरुन नेला.या दरोड्याचा सखोल तपास साक्री पोलिसांनी करून या दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास साक्री पोलिस करीत आहेत.

Previous articleभारतातील कोरियन राजदूतांची दुर्ग दुर्गेश्वर रायगडास भेट.
Next articleना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला गती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here