Home कोकण अँड संतोष धोत्रे यांची युवासेना सहसचिव पदी निवड 🛑

अँड संतोष धोत्रे यांची युवासेना सहसचिव पदी निवड 🛑

171
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 अँड संतोष धोत्रे यांची युवासेना सहसचिव पदी निवड 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:- ⭕खेड तालुक्यातील आंबये गाव, बौध्दवाडीतील सुपुत्र अँड संतोष धोत्रे हे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या हिरहिरींन आणि आत्मीयतेने कार्यरत आहेत.

विद्यार्थी चळवळीत त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे गेली दोन दशके ते शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी स्वतः M.A.LLM.DLL अशा पदव्या संपादन केल्या आहेत.

आज पर्यंत त्यांनी अनेक गरजू विद्या्थ्यांसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय खडतर ,त्यांचं प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागात अगदी प्रतिकूल परिस्थितीत झालं असल्यानं त्यांना परिस्थितीची जाण आहे म्हणून ते नेहमी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या हाकेला धावतात जरी आता मुंबई मध्ये स्थित असले तरी ग्रामीण ठिकाणी सुद्धा त्यांच्या कार्याचा ओघ अविरत चालू आहे,त्यांचा ग्रामीण भागात दांडगा संपर्क असून तेथील प्रशासकीय यंत्रणेवर चांगला दबाव आम्ही अनेक कामातून पाहिला आहे. या सर्व त्यांचा कामाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनाचे आणि युवासेना चे प्रमुख, राज्याचे पर्यावरण मंत्री मा. अदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या सहकार्याने अँड संतोष धोत्रे यांची युवा सेना सहसचिव या पदावर निवड केली आहे. ⭕

Previous articleरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची वसई सावंतवाडी रेल्वे संघटनेची मागणी 🛑
Next articleबागलाण तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here