Home भंडारा लाखनीच्या निसर्गमहोत्सवात तयार झाले ‘पर्यावरणस्नेही किल्ले’

लाखनीच्या निसर्गमहोत्सवात तयार झाले ‘पर्यावरणस्नेही किल्ले’

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_174909.jpg

लाखनीच्या निसर्गमहोत्सवात तयार झाले ‘पर्यावरणस्नेही किल्ले’

दीपावली सुट्टीमध्ये लाखनी शहरात तयार झाले आकर्षक शिववैभव किल्ले

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे लागोपाठ 18 व्या वर्षी पर्यावरण संदेश देणाऱ्या किल्ला स्पर्धेचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे श्रावण महिना ते दीपावली सुट्टीच्या कालावधीत प्रत्येक सणानुसार अनेक उपक्रम व स्पर्धाचे आयोजन लाखनी निसर्गमहोत्सवानिमित्ताने करण्यात आले.याअंतर्गतच दीपावली महोत्सवाचे आयोजन लागोपाठ 18 व्या वर्षी केले असून त्यात पर्यावरणसंदेश देणारी रांगोळी स्पर्धासोबत आकाशकंदिल बनवा स्पर्धा ,पर्यावरण पणती सजावट स्पर्धा त्याचबरोबर पर्यावरणस्नेही शिववैभव किल्ले स्पर्धाचे आयोजन केले गेले आहे अशी माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी दिली. या कार्यक्रमास नेफडो विभागीय वन्यजीव समिती जि भंडारा व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य केले.
लाखनी शहरात मागील 16 वर्षांपासून स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून अविरतपणे दरवर्षी मेहनत घेत शिवाजीची महत्ती सांगणारे हुबेहूब शिववैभव किल्ले बनविणारे डॉ. उदय राजहंस व डॉ. प्रतिभा राजहंस यांचा तोरणा किल्ला अर्थात प्रचंडगड किल्ला यावर्षीसुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. डॉ उदय राजहंस यांनी यावेळी तोरणा किल्ला व संबंधित छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाबद्दल मंत्रमुग्ध करणारी माहिती उपस्थित स्पर्धकांना व नागरिकांना सादर केली.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या नेचर पार्कवर आयोजित दीपावली पर्यावरण रांगोळी स्पर्धेकरिता जमलेल्या स्पर्धकांना डॉ. उदय राजहंस तसेच सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, डॉ.दीपक आगलावे यांच्याबरोबर ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी प्रा.अशोक गायधने, अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, मंगल खांडेकर,सेवानिवृत्त महसूल निरीक्षक गोपाळ बोरकर,सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे इत्यादींनी पर्यावरणस्नेही शिववैभव डोंगरी किल्ले कसे तयार करावे याचे परिपूर्ण मार्गदर्शन व माहिती दिली.
डॉ .उदय राजहंस यांच्या या मार्गदर्शक किल्ला प्रतिकृतीने प्रेरित होऊन दीपावली सुट्टीच्या कालावधीत सर्वच स्पर्धकांनी उत्तम तयारी करीत आकर्षक शिववैभव व पर्यावरणस्नेही किल्ले टाकावू वस्तूचा तसेच टाकावू फटाक्यांचा वापर करीत बनविले.
या पर्यावरण संदेश देणाऱ्या शिववैभव किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक आशिष खेडकर याच्या रायगड या आकर्षक किल्ल्याला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक ओंकार चाचेरे व रोहन मांढरे याच्या राजगड या सूंदर किल्ला प्रतिकृतीला प्राप्त झाला तर तृतीय क्रमांक खुशी,पूजा,अपूर्वा निखाडे या तिघा भगिनींनी तयार केलेल्या अप्रतिम अशा पन्हाळा किल्ला प्रतिकृतीस प्राप्त झाला.चतुर्थ क्रमांक श्रीनय मंगल चाचेरे याच्या सिंधुदुर्ग किल्ला प्रतिकृतीला प्राप्त झाला.तर प्रोत्साहनपर क्रमांक सृष्टी वंजारी हिच्या काल्पनिक किल्ल्यास प्राप्त झाला
स्पर्धेचे परीक्षण ग्रीनफ्रेंड्स पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे ,अशोक वैद्य,मंगल खांडेकर,अशोक नंदेश्वर, टोलीराम सार्वे, संदीप मेश्राम,सेवा निवृत्त महसूल निरीक्षक गोपाल बोरकर ,सेनि प्राचार्य अशोक हलमारे यांनी केले
लाखनी निसर्गमहोत्सव व दीपावली महोत्सव अंतर्गत आयोजित पर्यावरणस्नेही किल्ला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,आकाशकंदिल बनवा ,पणती सजावट स्पर्धाच्या आयोजनाकरिता लाखनी नगरपंचायत ,सावरी ग्रामपंचायतचे सरपंच सचिन बागडे,लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदिप भांडारकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षक अभियंता नितेश नागरीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रजत अटकरे तसेच ऋतुजा वंजारी , श्रीहॉस्पिटल लाखनीचे डॉ. योगेश गिर्हेपुंजे,वनौषधी शेती पुरस्कर्ते इंजि. राजेश गायधनी,नाना वाघाये,सेवानिवृत्त महसुल निरीक्षक गोपाल बोरकर,से.नि.प्राचार्य अशोक हलमारे इत्यादींनी आयोजनाकरिता अथक परिश्रम घेतले.

Previous article भंडारा जिल्ह्यातील संगणक परिचालक भर पावसात बसले आदोलनाला… कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी
Next articleलाखनी विदर्भ कोकण बँकेत संविधान दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here