Home सामाजिक युद्ध नको ,बुद्ध हवा :-गायक तनुजा नागदेवे

युद्ध नको ,बुद्ध हवा :-गायक तनुजा नागदेवे

298

आशाताई बच्छाव

IMG_20231104_124339.jpg

युद्ध नको ,बुद्ध हवा :-गायक तनुजा नागदेवे

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) बुद्ध धम्म हा मानवतेवर प्रेम, करुनेवर धम्म आधारीत असून बौद्ध धम्म कल्याणकारी धम्म आहे आणि म्हणूनच या धम्माचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्म स्वीकारला म्हणून बौद्ध धम्म ओळखला जातो
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणाकरिता बौद्ध धम्म दिला तो धम्म सर्व बौद्ध बांधवांनी अंगिकरावा व धम्माचे आचरण करावे आणि ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञा आचरणामध्ये आणावे त्यामुळे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार होईल आणि आपला देश एका उज्वल भविष्याकडे वाटचाल करेल समाज वाटचाल करेल समाजामध्ये परिवर्तन घडविणे असे मत संगीतमय कार्यक्रमात प्रबोधनकार तनुजा अमित नागदेवे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील गोपाळटोली या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्था या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनातून मत व्यक्त केले याप्रसंगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले ,माजी खासदार खुशाल बोपचे यांनी गायक तनुजा नागदेवे यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्या स्वतः त्यांनी तनुजा नागदेवे यांचे गीत प्रत्यक्ष बसून ऐकून घेतले व मंत्रमुग्ध झाले व इतर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित होते वसंता राऊत, अमित नागदेवे, समिर गोंडाणे, संदेश राऊत, ज्योती घरडे व इतर कार्यकर्ते त्यांच्यासोबत संगीतमय ताल देत होते हे विशेष

Previous articleमराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीचे कमी करू नका: प्रांतीय दैनिक समिती बैठकीत खा. रामदास तळस यांची मागणी.
Next articleभ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड- कु. संजना संजीव भांबोरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.