Home अमरावती मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीचे कमी करू नका: प्रांतीय दैनिक समिती बैठकीत...

मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीचे कमी करू नका: प्रांतीय दैनिक समिती बैठकीत खा. रामदास तळस यांची मागणी.

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20231104_123923.jpg

मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीचे कमी करू नका: प्रांतीय दैनिक समिती बैठकीत खा. रामदास तळस यांची मागणी.
—————————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती जिल्हा .प्रतिनिधी.
अमरावती.
मराठा समाजाला आरक्षण जरूर द्या, परंतु त्यासाठी ओबीसीचा कोठा कमी होता कामा नये, अशी भूमिका प्रांतीय तैलीक समितीने घेतला आहे. समितीचे राष्ट्रीय पदाधिकारी वर्ध्याचे खासदार रामदास तळस यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच अमरावती येथे समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंबादेवी रोड स्थित हॉटेल रालेश मध्ये झालेल्या या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रांतीय समितीची ज्येष्ठ पदाधिकारी भूषण कर्डिले, नाना शेलार, अमरावती म.न.पा.चे माजी सभापती शंकरराव हींगासपुरे, डाफे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. या बैठकीत आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. बहुतंशा पदाधिकाऱ्यांनी त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली, परंतु त्यांना आरक्षण देत असताना इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण कमी होणार नाही, किंवा त्यांना दिले जाणार आरक्षण ओबीसीच्या कोट्यातीलच असेल, असे होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.खा. रामदास तडस यांच्या मते, भाजपने दोन्ही घटकांना स्वातंत्रपणे आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तसे झाले ही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here