Home अमरावती अमरावती जिल्ह्यात मोझरी येथे लाखो गुरुदेव भक्तांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली:...

अमरावती जिल्ह्यात मोझरी येथे लाखो गुरुदेव भक्तांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली: २० पेक्षा जास्त परदेशी पाहुण्यांनी अनुभवाला नयनरम्य सोहळा. ————————-

82
0

आशाताई बच्छाव

IMG_20231104_123242.jpg

अमरावती जिल्ह्यात मोझरी येथे लाखो गुरुदेव भक्तांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली: २० पेक्षा जास्त परदेशी पाहुण्यांनी अनुभवाला नयनरम्य सोहळा.
————————-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
देशमुख.
अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती
ईश्वर शांतीचा संदेश देणारे मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी सोहळा पावन भूमी गुरुकुल्य आश्रम मोझरी येथे शिस्तबद्ध पद्धतीने पार वाजून ५८ मिनिटांनी केवळ २ मिनिटासाठी गुरुकुंज नगरी अक्षरशा: स्तब्ध झाली होती. गुरु भूमी उपस्थित लाखो गुरू देव भक्तांनी यावेळी राष्ट्रसंतांना आहे, त्या ठिकाणी उभे राहून मोहन श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी २० पेक्षा जास्त परदेशी गुरुदेव भक्तही उपस्थित होते. मोहन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३ वाजता”गुरुदेव हमारा प्यारा है”या अर्चना गीताने प्रारंभ झाला. यावेळी राष्ट्रसंताच्या विश्वव्यापक कार्याची माहिती शब्दसुरांनी जैन समुदायाला करून देण्यात आली. सुमारे दोन तास लाखोच्या जनसमुदाया राष्ट्रसंताच्या विश्वात्मक कार्यसह दिवत्याचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता. महा दारावरील विशाल घंटेचा निनाद होता शिस्तबद्ध रीतीने लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंताच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. नंतर आरती व सामूहिक प्रतीक्षा केली. नंतर यावेळी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन अशा सर्व धर्माच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूकडून करण्यात आल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वतःच्या कामाची नियोजन करून, मिळेल त्या वाहनाने राष्ट्रसंतांना अभिवादन करण्यासाठी गुरुदेव भक्त उपस्थित झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली ची वेळ जवळ येत असताना गुरुदेव भक्तांचे जथ्थे गुरुकुल जात दाखल होत होते. कार्यक्रमाची नियोजन अध्यात्मिक विभाग प्रमुख डॉक्टर राजाराम बोथे यांनी केले. मौन श्रद्धांजलीच्या वेळी खा. नवनीत राणा, खा.डा. अनिल बोंडे, आ.ऑड. यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, आ. देवेंद्र भुयार, अमोल मिटकरी, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ संचालक अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मोहन श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुकुल येथे मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.

Previous articleसतिश मुळीक यांना समाजरत्न पुरस्कार
Next articleमराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीचे कमी करू नका: प्रांतीय दैनिक समिती बैठकीत खा. रामदास तळस यांची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here