Home भंडारा  भंडारा जिल्ह्यातील संगणक परिचालक भर पावसात बसले आदोलनाला… कर्मचारी दर्जा व किमान...

 भंडारा जिल्ह्यातील संगणक परिचालक भर पावसात बसले आदोलनाला… कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_174204.jpg

भंडारा जिल्ह्यातील संगणक परिचालक भर पावसात बसले आदोलनाला…
कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर आधी संग्राम व आता आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत मागील 12 वर्षापासून संगणक परीचालक अगदीच तुटपुज्या मानधनावर राज्यभरातील 10 कोटी जनतेपर्यंत पोहोचवून सेवा देण्याचे काम करीत आहे. तेव्हा त्याच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने ग्रामीण भागातील संगणक परीचालकाना यावलकर समितीचे शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधामध्ये पद निर्मीती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आवश्यक आहे. संगणक परिचालकाच्या मागणीचा प्रश्न 12 वर्षापासुन प्रलंबित असून त्यासाठी संघटनेतर्फे नागपुर, मुंबई याठिकाणी अनेक आंदोलने करण्यात आली. मागिल हिवाळी अधिवेशनात ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यानी लेखी आश्वासन दिले. तसेच त्याचेशी अनेकदा बैठका झाल्या त्यात तुम्हाला यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आकृतीबंधात समाविष्ट करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचे मान्य केले व तसा प्रस्ताव संबंधित खात्याकडे पाठवला असल्याचे वारंवार सांगण्यात आले मात्र अद्यापही निर्णय लागलेला नाही.

ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केद्र प्रकल्पात कार्यरत संगणक परीचालकांनी यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधानुसार लिपिक कम डाटा एंट्री ऑपरेटर पदावर सामावून घेवून किमान वेतन कायदा 1948 नुसार निश्चित तारखेला नियमित मासिक वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून 08/11/2023 पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे सुरू असतांनाच 20/11/2023 ला राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

काल दि.28/11/2023 ला तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन नियोजित होते. आणि नेमक्या याच दिवशी पहाटेपासून जिल्ह्यात कुठे मुसळधार तर कुठे तुरळक पाऊस सुरू झाला. अशाही परिस्थितीत एक न एक संगणक परीचालकानी नियोजित आदोलनात उपस्थित राहुन आपल्या विविध मागण्यांबाबतचे एकदिवसीय आदोलन यशस्वी पार पाडले.

संगणक परिचालकाच्या आदोलनाला दिवसभरात अनेक नेत्यांनी भेट देऊन मागण्यांबाबत चर्चा केली. त्यात भंडारा गोदीया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.सुनिलजी मेढे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष मा.गंगाधरजी जिभकाटे,जि.प. शिक्षण सभापती मा.रमेशजी पारधी, जि.प.सभापती बालुभाऊ सेलोकर, जि.प.गटनेते विनोदजी बाते, राष्ट्रीय युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यानी निवेदन स्वीकारून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष दिगांबर वंजारी यानी केले.

दि.11 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर 22000 संगणक परीचालकाचा धडकणार मोर्चा
सुरू असलेल्या आदोलनाची दखल घेऊन सरकारने लवकरात लवकर बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय द्यावा. तसे न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनावर नागपुर येथे भव्य मोर्चा व मागण्यां मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भंडारा जिल्हाध्यक्ष दिगांबर कुंडलिक वंजारी यांनी सागितले आहे.

मागिल 12 वर्षांत संघटनेतर्फे राज्यस्तरावर शेकडो आंदोलने केली मात्र प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांनी आश्वासन देऊन वेळ मारून नेला.यावेळी आम्ही निर्णय लागेस्तोवर माघार घेणार नाहीत.शासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये लवकरात लवकर बैठक आयोजित करून निर्णय द्यावा.

दिगांबर कुंडलिक वंजारी
जिल्हाध्यक्ष म.रा.ग्रा.सं.प.क.संघटना भंडारा

Previous articleअवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी- राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे
Next articleलाखनीच्या निसर्गमहोत्सवात तयार झाले ‘पर्यावरणस्नेही किल्ले’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here