Home बुलढाणा सोनाळा मध्ये  आमदार डॉ संजय कुटे ध्येय नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न

सोनाळा मध्ये  आमदार डॉ संजय कुटे ध्येय नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न

54
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220513-WA0012.jpg

सोनाळा मध्ये  आमदार डॉ संजय कुटे ध्येय नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न                                                            संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

सोनाळा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते  प्रमोद उर्फ नानाभाऊ इंगळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.डॉ. संजयजी कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय होती हे विशेष आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. संजय कुटे यांनी पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून भाजपा पक्षाकडून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या धोरणानुसार चालणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी हे परिवार वादी पार्टी नसून सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षामध्ये सर्वांचा मान सन्मान आणि प्रत्येकाची भावना जोपासण्याचे काम करण्यात येते तसेच वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या जुन्या कार्यकर्त्यांनी समजावून घेऊन,त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या समस्या समजावून घ्याव्यात असे आव्हाहन मा. आमदार डॉ. संजय कुटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे

आणि याच प्रेमापोटी पश्चिम बंगाल सारख्या ठिकाणी जिथे आपण झिरो होतो तिथे आपले नेतृत्व ,प्रेम आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आता जवळपास भाजपचे ८० ते ९०आमदार झालेले आहे अशी भाजप ची ताकत, जिव्हाळा आणि कार्यशैली आहे असे उदाहरण त्यांनी लोकांना पटवुन दिले, टाळ्यांच्या कडकडाटी सह गावातील लोकं त्यांना प्रतिसाद देत होते
कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष जानराव बापू देशमुख ,तालुकाध्यक्ष लोकेशजी राठी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख , विजयजी भुतळा , प्रमोद खोद्रे जि. प. सदस्य ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. यादगिरे ताई ,पांडुरंग हागे, डॉ. गणेश दातीर,सुभाष भाऊ हागे, प्रकाश गोतमारे,रामदास मसाळ, गजाननराव दाणे, प्रकाश पाटील, नारायण अवचार , गणेश गोतमारे,प्रकाश पाटील वाघ, तालुका अध्यक्ष जळगाव ,सुधाकर भाऊ, शेजोळे, भालटिळक महाराज, पांडुरंग राहणे, संजय भटकर, शेख रशीद भाई ,सुधीर लव्हाळे, नरसिमा पिंजरकार, संतोष भैय्या जयस्वाल, रमेश खोकले ,गजानन खरप ,सचिन अग्रवाल, डॉ. अमोल कुकडे,पवन अस्वार, मुरलीधर चोरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोडदे सर, प्रास्ताविक सचिन अग्रवाल, तर आभार प्रदर्शन मनोज पाटील यांनी केले

Previous articleम्हणतांना अगदी गोड “पाणी हेच जीवन” प्रत्यक्षांत मात्र अर्धे उपाशी बाकी तुपाशी,गावकरी दुष्काळात प्रशासक व्यस्त आहेत दप्तरात?
Next articleकळमदरेत आज हरिनाम सप्ताहाची उत्साही वातावरणात सांगता           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here