Home नाशिक साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे दिवाळी सण उत्साहात साजरा..

साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे दिवाळी सण उत्साहात साजरा..

50
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_155916.jpg

साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे दिवाळी सण उत्साहात साजरा..
लखमापूर,(निंबा जाधव)-अहिरेश्वर कॅम्पस लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक संकुलात दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला..
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲड. शशिकांत अहिरे , प्राचार्या प्रा. रोशनी अहिरे उप प्राचार्या सोनल हरपळे, सुनील अहिरे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते..
लक्ष्मीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.. विविध प्रकारची पारंपरिक वेशभूषा करून आलेले विद्यार्थी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित वर्ग सजावटीची स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने नटलेली होती..
सामाजिक सलोखा , पर्यावरण पूरक दिवाळी , महिला सबलीकरण अशा विविध सामाजिक विषयांच्या रांगोळी सदर करत विद्यार्थ्यांनी अनोखा संदेश दिला..
सर्व सजावटीचे निरक्षण करत मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले..
शालेय मैदानावर विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला..
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ॲड. आहिरे यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी सण साजरा करण्याचा सल्ला दिला तसेच दिवाळीची सुटी साजरी करताना अभ्यासावर देखील लक्ष देण्याची सूचना केली.
शाळे द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या दिवाळी अभ्यास पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..
विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या दिव्यांचे संच प्रमुख मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले..
विद्यार्थ्यांनी देखील सुरक्षित व पर्यावरण पूरक दिवाळी सण साजरा करण्याचा संकल्प केला..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार निकम यांनी केले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..

Previous articleसंतेश्वर ज्ञान सांस्कृतिक भवनात शिव महापुराण कथे पारंपरिक कार्यक्रमात संतांची बैठक पार पडली.
Next articleनाशिकमध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here