Home अमरावती पृथ्वीराज उर्फ साई तिरथकर यास विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. ————————

पृथ्वीराज उर्फ साई तिरथकर यास विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. ————————

38
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-211720_WhatsApp.jpg

पृथ्वीराज उर्फ साई तिरथकर यास विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक.
————————
दैनिक युवा मराठा.

पी.एन.देशमुख.
अमरावती विभागीय विभा ग संपादक.

अमरावती.

नुकत्याच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये मेजर ध्यानचंद हॉल या ठिकाणी डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा .अमरावती विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले. त्यामध्ये अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता . कॉलेज ऑफ इंजीनियरिंग श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ बी.ई.( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेंली कम्युनिकेशन )प्रथम वर्षाचा विद्यार्थी पृथ्वीराज उर्फ साई अतुल तिरथकर याने 74 किलो वजन गटात ग्रिको रोमन स्टाईल मध्ये सहभाग घेतला होता त्याने प्रथम फेरीमध्ये वाशिम जिल्ह्यातला पैलवान फ्रेंड्स याला चारीमुंडी चित व दुसऱ्या व अंतिम फेरीमध्ये अकोल्याचा बलाढ्य पैलवान याला आसमान दाखवून चीत केले. त्या वजन गटांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आणि याची निवड अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मेडल प्राप्त करेल अशी आशा त्याचे वडील अतुल तीरथकर त्याचे कोच रणवीर सिंग राहल यांनी व्यक्त केलेली आहे अतुल तिरथकर सुद्धा बी मेकॅनिकल इंजिनिअर असून दोनदा अमरावती विद्यापीठ कुस्तीमध्ये कलर होल्डर आहे. साईचे मोठे वडील प्रा डॉ. संजय तीरथकर पाच वेळा विदर्भ केसरी, महापौर केसरी व भारतीय कुस्ती संघाचे कोच म्हणून अनेकदा विदेशात भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे व त्याचे आजोबा श्रीधर उर्फ शिरू पैहेलवान तीरथकर हे जुन्या काळातील गेटच्या नावाजलेले मल्ल होते त्याचा चुलत भाऊ वेदांत सुद्धा दोन वेळा विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये कलर होल्डर आहे सध्या एमटेक इंजीनियरिंग पूर्ण करून कंपनीमध्ये सेवा देत आहे त्याची चुलत बहीण मृण्मयी बी. ई. (माहिती व तंत्रज्ञान) मध्ये शिक्षक पूर्ण करून ही सुद्धा स्विमिंग मध्ये अमरावती विद्यापीठ चे कलर होल्डर असून त्याची बहीण माही सुद्धा जिम्नॅस्टिक मध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे साईचा चुलत भाऊ रुपेश तिरथकर हा सुद्धा अमरावती विद्यापीठाचा कुस्ती कलर आहे सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहे साई चे मोठे वडील सुद्धा नुकताच डेप्युटी इंजिनियर या पदा वरून पीडब्ल्यूडी मधून सेवानिवृत्त झाले आहे .तीरथकर परिवार उच्च शिक्षित असून गेटच्या आत मधले क्रीडा घराण आहे क्रीडा घराणे असून सुद्धा आपल्या घरीच नाही तर आपल्या गेटच्या आतील, शहरातील आपल्या विदर्भातील नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करणारा घराण आहे. जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मध्ये तिरथकार परिवाराची तिसरी पिढी कार्यरत आहे. स्व.गुरुवर्य अंबादास पंत वैद्य व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वाद या घराण्याला आहे. साईच्या यशामुळे गेटच्या आतील युवक बजरंग मंडळ मध्ये एक आनंदोत्सव चे वातावरण तयार झालेला आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आई वडील, गुरुजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंजली राऊत , डॉ.रणजीत केवले ,डॉ.विजय अग्रवाल समस्त प्राध्यापक गण यांना देतो. त्याच्या विजया बद्दल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव डॉ माधुरी चेण्डके ,उपाध्यक्ष श्रीकांत चेन्डकें, उपाध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे, प्रा रवींद्र खांडेकर यांनी साई चे अभिनंदन केलं व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या

Previous articleसन उत्सवात एसटीतून’लक्झरी’प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लीपर कोच बस.
Next articleदर्यापूर बस स्थानकात बस चालकाकडून पत्रकार आदेश खांडेकर याला मारहाण व शिवीगाळ . —————————–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here