राजेंद्र पाटील राऊत
स.पो.नि .महादेव पुरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त विविध क्षत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
नायगाव प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी शेकडो करवाया करून अवैध धंदेवाल्याना सळो की पळो करून सोडणारे दबंग सपोनि महादेव पुरी यांचा वाढदिवस विविध क्षत्रातील मान्यवरांसह पत्रकारांनी नुकताच वाढदिवस साजरा केला.
नायगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते , सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते अनेक गावातील सरपंच ,पत्रकार मंडळी , स्नेह मित्र परिवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने कुंटूर , नायगाव पोलिस ठाण्यात व मराठी पत्रकार संघाचे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांच्या निवासस्थानी नागेश कल्याण ,प्रल्हाद भंडारे ,कार्यध्यक्ष माधव धडेकर ,शिवाजी इबीतदार ,बालाजी शिळे,माधव सूर्यवंशी धनजकर आदींनी शाल ,श्रीफळ , गुलाब पुष्पहार देऊन शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला.
कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी हे जनसामान्य कुटुंबात जन्मास आले असले तरी आज गृहखात्यात पोलीस अधिकारी म्हणून जनतेला न्याय देण्याच काम करत असताना जनसामान्य व्यक्तीची जाणीव ठेवून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये म्हणून सदर प्रकरणाची दोनही बाजूने चौकशी करूनच पुढील कारवाई करून प्रत्यकाना न्याय देत ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एकूण ४५ गावावर त्यांची करडी नजर असल्यामुळे ठाण्याच्या हद्दीत शांततामय वातावरण निर्माण करून परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर करावया केल्यामुळे आज घडीला अवैधरित्या चालणारे धंदे हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. पोलीस खात्यात कर्तव्य बजावणारे कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक या दबंग पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस अनेक पत्रकार बांधवांसह हजारो चाहत्यांनी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.