Home अमरावती दर्यापूर बस स्थानकात बस चालकाकडून पत्रकार आदेश खांडेकर याला मारहाण व शिवीगाळ...

दर्यापूर बस स्थानकात बस चालकाकडून पत्रकार आदेश खांडेकर याला मारहाण व शिवीगाळ . —————————–

86
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-212213_WhatsApp.jpg

दर्यापूर बस स्थानकात बस चालकाकडून पत्रकार आदेश खांडेकर याला मारहाण व शिवीगाळ .
—————————–
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
गजानन जीरापुरे.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.

अमरावती (दर्यापूर)

– साप्ताहिक दर्यापूर दर्शन संपादक आदेश खांडेकर हे पत्रकार नात्याने दर्यापूर बस स्थानक येथे आरटीओ अधिकारी यांची मुलाखत घेण्याची बातमीचे संकलन करण्यासाठी गेलो असता दर्यापूर बस स्थानक येथील चालक कुऱ्हाडे इसमाने साप्ताहिक दर्यापूर दर्शन संपादक आदेश खांडेकर यांना बातमी घेण्यास मज्जाव करुन त्यांच्या 20 हजार रुपयांचा मोबाईल व माईक हिसकुन फेकून दिला व त्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली इतकेच नव्हे तर पत्रकारीते बद्दल अश्लील शिवीगाळ सुद्धा यावेळी त्या बस चालकाने केली.त्यावरच तो चालक थाबला नाही तर त्याने संपादक आदेश खांडेकर याला जीव मारण्याची धमकी सुद्धा दिली.पत्रकारांवर जर असे हल्ले होत राहिले तर सामान्य माणसाचे काय अशा गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांला इतकी मोठी ताकद येथे कुठून आणि अशा या कर्मचाऱ्याला कोण खतपाणी घालतोय अशा प्रश्न दर्यापूर बस स्थानकात येणाऱ्या नागरिकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here