Home Breaking News टी.जी.रातोळीकर मांजरम ग्रामपंचायतीला रुजू.

टी.जी.रातोळीकर मांजरम ग्रामपंचायतीला रुजू.

166
0

टी.जी.रातोळीकर मांजरम ग्रामपंचायतीला रुजू.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि. १९ ५ २०२१
मांजरम ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने अनेकदा अडीअडचणी सामना सामान्य लोकांना करावा लागत असत , नुकतेच कार्यक्षम व पूर्ण वेळ ग्रामसेवक म्हणून ज्यांची नोंद पंचायत समिती कडे आहे ते टी.जी. रातोळीकर हे नुकतेच मांजरम येथे रूजू होवून कार्यभार सांभाळला आहे.मांजरम ग्रामपंचायत नायगाव तालुक्यातील सर्वात मोठी आहे.गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने छोट्या मोठ्या अडचणी निर्माण होत असत.येथील नवनिर्वाचित महिला सरपंच शोभाबाई निळकंठराव माली पाटील, उपसरपंच मथुराबाई दिंगाबर पाटील शिंदे, यांच्यासह सदस्यांनी पूर्ण वेळ ग्रामसेवकाची मागणी नायगाव पंचायत समितीच्या सभापती प्रभावतीताई विठ्ठलराव कते यांच्या कडे  केली.विशेषता पंधरा सदस्या पैकी अकरा सदस्य महिला असून एका महिला सदस्यांचा मृत्यू झाला आहे.ग्राम पंचायतीत महिला राजअसल्याने काम करणारा पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळणे गरजेचे होते.नुकतेच नायगाव पंचायत समितीला पूर्ण वेळ व कार्यक्षम ग्रामसेवक म्हणून ज्यांची नोंद आहे. नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी.जी.रातोळीकर यांनी नुकताच मांजरमचा पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here