Home मुंबई आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’...

आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

30
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231018-064407_WhatsApp.jpg

आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

प्रवीण क्षीरसागर प्रतिनिधी युवा मराठा न्युज

भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.

शिष्टमंडळामध्ये ब्रुनेई दारुस्सलामचे उच्चायुक्त डाटो अलाहुद्दिन हज मोहम्मद ताहा, कंबोडियाचे राजदूत काय क्युओंग, इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मसनी एरिझा, सचिव हैदी नूर हशफी, लाओसचे राजदूत बौनमे, मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अर्निझल फेडझिल राजाली, कौन्सुल जनरल अहमद झुवैरी युसुफ, नोरमन झ्युलकार्नेन मोहम्मद नसरी, म्यानमारचे राजदूत मोय क्यॉ ऑंग, सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वॉंग, कौन्सुल जनरल ऑंग मिंग फुंग, थायलंडच्या राजदूत श्रीमती पट्टारल हॉंगटॉंग, सचिव थानचॉंक युथाऐवन, कौन्सुल जनरल दोन्नावित पूलसावत, व्हिएतनामचे कौन्सुल जनरल ले कॉंग बिएन यांचा समावेश होता.

Previous articleतळेगावच्या जनरल मोटर्स प्रकल्पातील कामगारांच्या ठामपणे पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleसागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here