• Home
  • 🛑 मुंबई ते मनमाड दरम्यान १२ सप्टेंबरपासून विशेष रेल्वे धावणार 🛑

🛑 मुंबई ते मनमाड दरम्यान १२ सप्टेंबरपासून विशेष रेल्वे धावणार 🛑

🛑 मुंबई ते मनमाड दरम्यान १२ सप्टेंबरपासून विशेष रेल्वे धावणार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ पुढील सूचना मिळेपर्यंत दि. १२.९.२०२० पासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

02109 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १२.९.२०२० पासून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल.

02110 विशेष मनमाड येथून दि. १२.०९.२०२० पासून दररोज ०६.०२ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला त्याच दिवशी १०.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव.

संरचना : १७ द्वितीय आसन श्रेणी + ३ वातानुकूलित चेअर कार.

आरक्षण : या विशेष रेल्वेगाड्या बुकिंगच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे….⭕

anews Banner

Leave A Comment