• Home
  • राष्ट्रवादीला विलिन करुन शरद पवारांना करा काँग्रेसचे अध्यक्ष…..! रामदास आठवले 🛑

राष्ट्रवादीला विलिन करुन शरद पवारांना करा काँग्रेसचे अध्यक्ष…..! रामदास आठवले 🛑

🛑 राष्ट्रवादीला विलिन करुन शरद पवारांना करा काँग्रेसचे अध्यक्ष…..! रामदास आठवले 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहतात. काँग्रेसच्या अध्यक्षदाबाबात सध्या चर्चा सुरू असतांना त्यांनी एक सूचना केली आहे. राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यांच्या या सूचनेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

आठवलेंनी ट्विट करून ही सूचना केली आहे. ते म्हणतात,

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे.

याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.

या आधीही अशाच पद्धतीची सूचना करण्यात आली होती. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी असंही त्यांनी म्हटलं होतं.

मात्र त्यासाठी कुणीही तयार नाही. तर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र ती त्यांनी मान्य केली नाही.

तर गुलाम नबी आझाद यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. या पत्राने काँग्रेसमध्ये वादळ निर्माण झालं होतं.

आता पुढचे सहा महिने सोनिया गांधी याच अध्यक्ष राहणार असून त्यानंतर निवडणुका होणार आहेत…..⭕

anews Banner

Leave A Comment