Home Breaking News 🛑 दाऊद इब्राहिमच्या नावे…! मुख्यमंत्र्यांना फोन, “मातोश्री ” उडवण्याची धमकी 🛑

🛑 दाऊद इब्राहिमच्या नावे…! मुख्यमंत्र्यांना फोन, “मातोश्री ” उडवण्याची धमकी 🛑

125
0

🛑 दाऊद इब्राहिमच्या नावे…! मुख्यमंत्र्यांना फोन, “मातोश्री ” उडवण्याची धमकी 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजता दुबईवरुन मातोश्रीवर एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे.

‘मला अजून याबाबतची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी मुंबईतील अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती घेत आहे. अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही. पण शिवसैनिक म्हणून सांगतो, शिवसैनिकांचा श्रद्धास्थान असलेल्या, आमच्या शिवसैनिकांचं मातोश्री हे एक मंदिर आहे. तिथे धमकी देणारा जगाच्या पाठीवर माणूस जन्माला यायचा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, माझे शिवसैनिक माझं सुरक्षाकवचं आहे. आम्ही देशभरातील शिवसैनिक मातोश्रीचं, उद्धव ठाकरेंचं, ठाकरे कुटुंबांचे त्यांचे रक्षण करु,’ अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. छातीचा कोट करुन मातोश्रीचे रक्षण करु – अरविंद सावंत

‘मातोश्रीला यापूर्वी अशा अनेक धमक्या आल्या. केसाला धक्का लावण्याची हिंमत नाही. शिवसैनिकांच्या छातीचा कोट करु आणि मातोश्री सुरक्षित राखू. अशा धमक्या भरपूर बघितल्या. उंदरासारखे बिळात लपून धमकी देणार आम्ही भरपूर पाहिले आहेत. पण सरकारनेही याबाबतची गंभीर दखल घेतली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस मातोश्रीचं, मुख्यमंत्र्यांचं, त्या मातोश्रीला लागून असलेल्या सर्वांचे रक्षण करतील. आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी काहीही बोलो, याची चौकशी नक्की होईल. फोन करुन घाबरवणं ही पहिली वेळ नाही. असे अनेकदा घडलं आहे. शिवसैनिकांची अभेद्य भिंत कायम त्यांच्यासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दाऊद इब्राहिम कोण?

गुन्हेगारी विश्वाचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई आणि परिसरात अनेक गुन्ह्यांची मालिका उघडली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो. भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.

दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल….⭕

Previous article🛑 रेल्वेच्या 1.40 लाख पदांसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा 🛑
Next articleराष्ट्रवादीला विलिन करुन शरद पवारांना करा काँग्रेसचे अध्यक्ष…..! रामदास आठवले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here