Home Breaking News 🛑 रेल्वेच्या 1.40 लाख पदांसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा 🛑

🛑 रेल्वेच्या 1.40 लाख पदांसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा 🛑

88
0

🛑 रेल्वेच्या 1.40 लाख पदांसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 7 सप्टेंबर : ⭕ रेल्वे 15 सप्टेंबरपासून 1.40 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणार असल्याची माहिती भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी दिली आहे. यादव यांनी सांगितले की 15 सप्टेंबपासून कॉम्प्युटर आधारित परीक्षेचा पहिला टप्पा आयोजित केला जाईल.

ही परीक्षा 3 श्रेणींच्या जवळपास 1.40 लाख पदे भरण्यासाठी आयोजित केली जाईल. पदे तीन प्रकारची असून, यात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (गार्ड, क्लार्क इ.), स्वतंत्र आणि मंत्रीस्तरीय व लेव्हल 1 (ट्रॅक मॅनेजर, पॉइंट्समन इ.) ही पदे असतील. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देखील ट्विट करत याबाबत पुष्टी केली आहे.

कोरोना व्हायरस महामारीमुळे परीक्षा आयोजित करता आल्या नाहीत. आम्ही 1,40,640 पदांसाठी विविध श्रेणींमधील भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. कोरोना महामारीच्या आधी याबाबत सुचित करण्यात आले होते. मात्र कोव्हिड महामारीमुळे कॉम्प्युटर आधारित परीक्षा पुर्ण झाली नाही.

रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे भरती बोर्ड सर्व अधिसूचित रिक्त जागांसाठी कॉम्प्युटर-आधारित परीक्षा आयोजित करण्यास वचनबद्ध आहे आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेत आहे.⭕

Previous article🛑 IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक 🛑
Next article🛑 दाऊद इब्राहिमच्या नावे…! मुख्यमंत्र्यांना फोन, “मातोश्री ” उडवण्याची धमकी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here