Home बुलढाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी राजवाडा येथे माँ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी राजवाडा येथे माँ जिजाऊ यांचे घेतले दर्शन

113

राजेंद्र पाटील राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी
राजवाडा येथे माँ जिजाऊ यांचे घेतले दर्शन
(बुलडाणा, स्वप्निल देशमूख ब्यूरो चिफ यूवा मराठा न्यूज )  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंदखेडराजा येथील विविध ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. पाहणी करून राजे लखोजी जाधव राजवाडा येथील माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देत दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, आमदार किरण सरनाईक, नगराध्यक्ष सतिष तायडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, ॲड नाझेर काझी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राजवाडा येथे पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. राज्य पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाने यांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. शिवाजी राजे जाधव यांनी यावेळी लखोजी राजे जाधव यांनी प्रतिमा भेट दिली.
सुरूवातीला जिजाऊ सृष्टीला भेट देवून माँ जिजाऊ यांना अभिवादन केले. त्यानंतर मोती तलाव, काळा कोट येथील संग्रहालय व परीसर, सावकारवाडा, रंग महाल, निळकंठेश्वर मंदीर, रामेश्वर मंदीर, राजे लखोजी जाधव यांच समाधी, पुतळा बारव या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान सुरू असलेली संवर्धन व संरक्षणाची कामांची पाहणी करीत श्री. पवार यांनी दर्जेदार व पर्यटन वाढीस अनुकूल असणारी कामे करण्याच्या सूचना दिल्या. रंगमहालची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी वापरण्यात येणारे साहित्याची तपासणी केली. तसेच येथील कामगारांची विचारपूस केली. जिजाऊ सृष्टी हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे स्वागत करण्यात आले. दौऱ्यादरम्यान राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत आदी उपस्थित होते.

Previous articleचालत्या वाहनावर बिबट्याचा हल्ला।
Next articleहसनाळ (प.दे.) सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध तर चेअरमनपदी भाजपाचे एकनाथराव मल्हारराव नाईक यांची निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.