Home नाशिक नाशिकमध्ये वयोवृध्द महिलेच्या गळ्यातून साठ हजाराची माळ लंपास ;पोलिसांकडून चोरटा जेरबंद

नाशिकमध्ये वयोवृध्द महिलेच्या गळ्यातून साठ हजाराची माळ लंपास ;पोलिसांकडून चोरटा जेरबंद

73
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231011-053737_WhatsApp.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड (प्रतिनिधी)
सातपूर येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी येथे राहणारे कांता शांतीलाल बरडिया (वय६६) हे जेवण करून रात्री ९ वाजेच्या सुमारास घराच्या पायरीवर बसलेल्या होत्या त्यांचे पती शांतीलाल बरडिया हे जेवण करून फिरण्यासाठी गेले असता ते एकट्याच बसलेले पाहून एक इसम पायी चालत आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची मंगळसूत्र पोत (किंमत ६०,०००) खेचून घेत जिजामाता शाळेच्या दिशेने त्याने पळ काढला त्यावेळी कांता शांतीलाल बरडिया यांनी आरडाओरडा केला असता गल्लीतील सर्व नागरिक त्या ठिकाणी गोळा झाले त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु तो व्यक्ती सापडला नाही
यावरून कांता शांतीलाल बरडिया यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत शोध मोहीम सुरू केली असता तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने सदर इसमाचे नाव आणि पत्ता आढळले विरेन चेतन वाघ असे सदर इसमाचे नाव राहणार एम एच बी कॉलनी शिवनेरी गार्डन सातपूर कॉलनी सातपूर या ठिकाणी घरात असताना त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले त्याच्याकडून दोन तोळे सोन्याची मंगळसूत्र पोत (६०,००० किंमत) हस्तगत करण्यात आले
सातपूर पोलिसांनी १२ तासांच्या आत चेन स्नॅचिंन करणारा गुन्हेगार ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले यामध्ये अंकुश शिंदे पोलिस आयुक्त नाशिक शहर , मोनिका राऊत पोलिस उपायुक्त शेखर देशमुख सहा. पोलिस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांचे मार्गदर्शन होते आणि आदी पोलिस उपस्थित होते

Previous articleनाशिकच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
Next articleमुक्रमाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण रथाचे जंगी स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here