Home बुलढाणा वानखेड मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु

वानखेड मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु

134

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0056.jpg

वानखेड मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु

युवा मराठा नयुज वेब पोर्टल प्रतिनिधी:- रवि शिरस्कार संग्रामपूर
दिनांक १७ आणि १८ जुलै पासुन सुरु झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिके नष्ट झाली आहे संततधार झालेल्या या जोरदार पावसामुळे मुळे वानखेड तसेच पातुर्डा परिसरात अतिवृष्टी सारख्या पावसामुळे वान नदीला पूर व नाल्याच्या काठावरील शेतजमीन खरडून गेली व काही समतोल जमिनीत पाऊसाच पाणी थांबले त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पिकांचे काही प्रमाणात तर काही लोकांच बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले
वानखेड येथील श्रीमती शांताबाई मोहन बंड यांच्या गट क्रं 918 या नदीकाठच्या एकूण 1 हेक्टर 70 आर या क्षेत्रातील तब्बल 40 आर शेती खरडुन चक्क नदीमद्धे सामावली आहे,त्याचप्रमाणे सुरेश सांगळे 40आर,पंढरी सांगळे12आर,गजानन बंड23आर,विश्वनाथ सांगळे20आर यांच्या वाहून गेलेल्या शेतीचे दिनांक 29 जुलै ला पंचनामा केला आहे
तसेच मा.तहसीलदार साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार वानखेड येथील इतर शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून महसुल विभागात दाखल करण्यात आले आहे
यामध्ये वानखेड येथील ग्रामसेवक, गाव तलाठी, संग्रामपुर कृषी सहायक यांनी संयुक्त पंचनामे सादर केले आहेत.
तरी नुकसान झालेल्या, या काही शेतकऱ्यांना प्रशासनाकडून काय मदत होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleलखमापुर ते तळवाडे रस्ता ची दयनीय अवस्था रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा!
Next articleइराणला जोरदार पावसाचा फटका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.